soap saam tv
बिझनेस

Business Idea: पैशांसाठी सरकारी मदत घेऊन तुम्ही सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दर महिना होईल तगडी कमाई

Business Idea: तुमचीही बिझनेस करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हालाही बिझनेस सुरु करायचा आहे, पण कळत नाहीये नेमका कोणता बिझनेस सुरु करायचा? तुमचीही बिझनेस करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये प्रोडक्टची कायम मागणी असते.

आम्ही साबण मॅन्युफॅक्चरिंग यूनिटबद्दल बोलतोय. या व्यवसायात मशिनच्या मदतीने साबण बनवण्यात येतात यानंतर बाजारात नेले जातात. मात्र, अनेकजण हाताने साबण बनवून बाजारात विकतात. चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणातही सुरू करता येतो.

साबणाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. अगदी लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत, गावांमध्ये सर्व घरात साबणाचा वापर आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मुळात म्हणजे तुम्ही अगदी कमी पैशात साबणाचं मॅन्युफॅक्चरिंग यूनिट उघडू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकता. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत.

या बिझनेससाठी तुम्हाला मिळेल कर्ज

साबणाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. यामध्ये युनिटची जागा, यंत्रसामग्री, भांडवल यांचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागणार आहे. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता.

साबण बनवण्याचे युनिट सेट करण्यासाठी तुम्हाला एकूण 750 चौरस फूट लागणार आहे. यामध्ये 500 चौरस फूट जागा बंद ठेवा आणि उर्वरित जागा ओपन ठेवा. यासाठी सर्व प्रकारच्या मशिन्ससह 8 प्रकारची उपकरणं लागणार आहेत. प्रकल्प अहवालानुसार, ही यंत्रं बसवण्यासाठी एकूण खर्च एका लाखापर्यंत येऊ शकतो.

साबणाच्या बिझनेसमुळे किती होऊ शकते कमाई?

केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रकल्प प्रोफाइलनुसार, तुम्ही 1 वर्षात एकूण 4 लाख किलो उत्पादन करू शकणार आहात. त्याची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये असेल. व्यवसायातील सर्व खर्च पाहिल्यानंतर तुम्हाला दरमहा 6 लाख रुपये म्हणजेच 50,000 रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT