बिझनेस

Xiaomi: कमी बजेटवाला मोबाईल हवा? मग थांबा शाओमी आणतोय स्वस्तातला मस्त फोन

Xiaomi: जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल निर्माती कंपनी शाओमी ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त फोन लॉन्च करत आहे.

Bharat Jadhav

जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहे, पण बजेटमुळे तुम्ही चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण शाओमी कंपनी ग्राहकांची आर्थिक अडचण लक्षात घेत कमी बजेटवाला फोन लॉन्च करत आहे. स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ग्राहकांसाठी एक नवीन स्मार्टफोन आणत आहे. Xiaomi चा नवीन स्मार्टफोन कमी बजेटचा स्मार्टफोन असणार आहे, यात अनेक फीचर्स असणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, शाओमी कंपनी India Mobile Congress मध्ये नवीन स्मार्टफोन आणत आहे. उद्या म्हणजे १५ ऑक्टोबरपासून India Mobile Congress कार्यक्रम चालू होत आहे. त्यात कंपनी नवीन फोन लॉन्च करत आहे. शाओमीने अद्याप आगामी स्मार्टफोनचे नाव काय असेल याची माहिती दिली नाहीये. दरम्यान कंपनी १६ ऑक्टोबरला इंडिया मोबाइल काँग्रेस इव्हेंट दरम्यान फोनचे नाव आणि वैशिष्ट्ये उघड करेल. शाओमी नवीन फोन या दिवशी दुपारी 4 वाजता लॉन्च केला जाणार आहे.

India Mobile Congress एशियामध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या डिजिटल इव्हेंटपैकी एक आहे. India Mobile Congress इव्हेंट तीन दिवसापर्यंत चालेल. हा कार्यक्रम दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात जगभरातील तंत्रज्ञानातील दिग्गज येणार आहेत. India Mobile Congress मध्ये अनेक कंपन्या आपले नवीन उपकरणे यात लॉन्च करणार आहेत. भारतात दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

IMC ची हे आठवे सत्र असणार आहे. Xiaomi चा आगामी स्मार्टफोन Snapdragon 4s Gen 2 चिपसेट ने सुसज्ज असेल. हा चिपसेट जुलै महिन्यातच लॉन्च करण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही टेक ब्रँडने या चिपसेटसह स्मार्टफोन लॉन्च केलेला नाही. Snapdragon 4s Gen 2 हा 4nm तंत्रज्ञानावर आधारित चिपसेट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT