twitter  saam tv
बिझनेस

X Down today : एलॉन मस्क यांचं एक्स प्लॅटफॉर्म डाऊन, एकाच दिवसांत तिसऱ्यांदा झालं विस्कळीत, कारण काय?

X Down today : एलॉन मस्क यांचं एक्स प्लॅटफॉर्म डाऊन झालं आहे. एकाच दिवसांत तिसऱ्यांदा सेवा विस्कळीत झाली आहे. कारण अद्याप स्पष्ट नाही.

Vishal Gangurde

एलॉन मस्क यांचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' डाऊन झालं आहे. 'एक्स' अचानक डाऊन झाल्याने युजर्स एकच संताप व्यक्त करत आहे. आज सोमवारी अनेकदा 'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन झालं. अमेरिका, युनायटेड किंगडम, भारत आणि जगातील अनेक भागात 'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन झालं आहे. एकाच दिवसांत तीन वेळा एक्स प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याचं समोर आलं आहे.

'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 'एक्स' प्लॅटफॉर्मकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. दुपारच्या सुमारास 'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन झालं होतं. त्यानंतर आता रात्री पुन्हा 'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन झालं आहे. अनेकांना 'एक्स' स्क्रोल करताना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

'एक्स' प्लॅटफॉर्म वारंवार डाऊन होऊ लागल्याने युजर्स संताप व्यक्त करत आहे. पहिल्यांदा 'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन झालेला नाही. याआधी देखील अनेकदा 'एक्स' प्लॅटफॉर्म डाऊन झालेले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आज सायंकाळी ७ वाजता 'एक्स' प्लॅटफॉर्मवर युजर्सना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. एकूण ५६ टक्के युजर्स अॅपवर समस्यांचा सामना करत आहेत. ३३ टक्के युजर्स वेबसाईटवर ११ टक्के लोकांना सर्वर कनेक्शनच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

२०२५ सालात पहिल्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात सेवा विस्कळीत आहे. याआधी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एक तास बंद विस्कळी झाली होती. आज १० मार्च रोजी दुपारी ३.२० वाजता एक्स प्लॅटफॉर्म डाऊन झाला होता. काही वेळानंतर पुन्हा 'एक्स' प्लॅटफॉर्म सुरु झाला. त्यानतंर पुन्हा ७ वाजता 'एक्स' युजर्सना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यानंतर आता ८ वाजून ४४ मिनिटांनी पुन्हा 'एक्स' डाऊन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT