Acemagic X1 Saam Tv
बिझनेस

Dual-Screen Laptop: जगातील पहिला ड्युअल स्क्रीन लॅपटॉप लॉन्च, Acemagic X1 चे फीचर्स जाणून थक्क व्हाल

Acemagic X1 Laptop लॉन्च झाला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा लॅपटॉप जगातील पहिला लॅपटॉप आहे, जो ड्युअल स्क्रीनसह उपलब्ध असेल.

साम टिव्ही ब्युरो

नवीन आणि जबरदस्त Acemagic X1 लॅपटॉप लॉन्च झाला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा लॅपटॉप जगातील पहिला लॅपटॉप आहे, जो ड्युअल स्क्रीनसह उपलब्ध असेल. या लॅपटॉपची स्क्रीन 360 डिग्री हॉरिझॉन्टल फोल्ड फीचरसह येते.

Acemagic X1 ला फ्लिप स्क्रीन देखील म्हटले जाऊ शकते. यात फ्लिप स्क्रीन असल्याने युजर्स त्यांच्या गरजेनुसार हा सेट करू शकतात. युजर्सला साइड बाय साइड डिस्प्ले म्हणून वापरायचा असले तरी हा लॅपटॉप अतिशय सोपा आहे.

Acemagic X1 मध्ये बॅक टू बॅक मोड देखील आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या समोर बसलेल्या व्यक्तीला लॅपटॉप स्क्रीन दाखवू शकता. तसेच हा लॅपटॉप गेम खेळणे आणि चित्रपट पाहणे इत्यादींसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. सध्या कंपनीकडून याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कंपनीने या लॅपटॉपमध्ये 12व्या जनरेशनचा इंटेल कोर i7-1255U प्रोसेसर वापरला आहे. याव्यतिरिक्त, Acemagic X1 मध्ये दोन 14-इंच फुल एचडी स्क्रीन आहेत. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर हा लॅपटॉप 16GB ड्युअल चॅनल DDR4 रॅम आणि 1TB SSD स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे.

यात दोन यूएसबी टाइप-सी, एक यूएसबी 3.0 टाइप-ए आणि एक एचडीएमआय 2.0 पोर्ट पॅक ग्राहकांना मिळेल. मात्र दोन यूएसबी-सी पोर्टपैकी एक फक्त चार्जिंगसाठी आहे. Acemagic ने सांगितले आहे की, हा लॅपटॉप वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2 ला सपोर्ट करतो आणि 70.4Wh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT