Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

ladki bahin yojana : लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

ladki bahin yojana update : लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... एकीकडे आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील, असं वाटतं होतं. मात्र, रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान आता नवा मुहूर्त लाडकीला देण्यात आलायं...पाहूया..

Bharat Mohalkar

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.... राज्य सरकार येत्या अक्षयतृतियेला लाडक्या बहीणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय...

राज्य सरकारने आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा केले आहेत.. त्यामुळे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? याकडे लाडक्या बहीणी डोळे लावून बसल्या आहेत... त्यातच 10 वा हप्ता रामनवमीला लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.. मात्र रामनवमीचा मुहूर्त टळल्याने अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला लाडकीच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे... मात्र हे पैसे जमा झालेत का? ते कसं शोधायचं? पाहूयात.

लाडकीचे पैसे चेक करायचे कसे?

पैसे खात्यावर जमा झाल्यास तुम्हाला मेसेज येईल

तुम्ही ऑनलाईन बँकींग अॅपवर चेक करु शकता

ऑफलाईन पद्धतीने बँकेत जाऊन पैसे आले की नाही? चेक करु शकता

बँकेत पासबुकवर एन्ट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल

राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारने लाडकींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला.. त्यातच आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाडकींची नावं वगळल्याचं समोर आलंय.. तर राज्य सरकारने अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीलाही कात्री लावण्यात आलीय.. त्यामुळे अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर किती लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळणार की अजून काही लाडक्या बहिणींना अपात्रतेचा झटका बसणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT