Petrol-Diesel Price Prediction: will petrol diesel price be Reduced by 9 to 10 Rupess before Lok Sabha 2024 elections Saam TV
बिझनेस

Petrol-Diesel Price Prediction: लोकसभा निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार? पेट्रोल-डिझेल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

Satish Daud

Petrol-Diesel Price Prediction Latest News

महागाईचा मार सहन करणाऱ्या सामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रतिबॅरेल ९४ डॉलरवर गेलेले कच्चे तेल आता ७८ डॉलरच्या आसपास आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील काही दिवसांपासून देशातील जनतेला महागाईचा मार सहन करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) तसेच घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे विरोधक केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी इंधनाच्या किंमतीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबियाने आशियाई देशांसाठी कच्चे तेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भारताला मोठा फायदा होणार आहे. सौदी अरामकोने आपल्या प्रमुख अरेबियन लाइट क्रूडच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. (Latest Marathi News)

ही कपात २७ महिन्यांच्या नीच्चांकी पातळीवर पोहचली आहे. यामुळे निवडणुकीच्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. असं झाल्यास महागाईही कमी होण्याची अपेक्षा आहे. तसे पाहता मे २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कुठलाही बदल झालेला नाही,

या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत बरेच चढ-उतार झाले आहेत. सध्या मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ इतका असून डिझेलचा ९२.७६ रुपये इतका आहे. दुसरीकडे दिल्लीत पेट्रोलचा भाव ९६.७२ रुपये प्रतिलीटर, तर डिझेल भाव ९०.८ प्रतिलीटरवर आहे. विशेष बाब म्हणजे कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल १०० डॉलर्सच्या आसपास गेल्यानंतही देशात पेट्रोल-डिझेलचा हाच भाव भाव कायम होता.

आता कच्चा तेलाचे दर ७८ डॉलर्सवर आल्याने पेट्रोल डिझेल दरात ९ ते १० रुपयांची कपात होऊ शकते. दरम्यान, भारतातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) रविवारी कृष्णा-गोदावरी खोऱ्यातून कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू केले.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी X.com (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे कच्चा तेलाच्या दरात आणखीच घसरण होण्याची शक्यता असून पेट्रोल-डिझेल दरात कपात करण्याचा चांगला योग आहे. असं झाल्यास सामन्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT