Gold Price Prediction 2026 google
बिझनेस

Gold Price 2026 :सोनं १ लाख २० हजारांवर येणार, २०-२५ हजारांनी होणार स्वस्त?

Gold Investment News : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पण केंद्रीय बँकांची खरेदी आणि जागतिक मागणीमुळे वर्षाच्या शेवटी पुन्हा तेजी येईल असा अंदाज वर्तवला आहे.

Sakshi Sunil Jadhav

गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना असा प्रश्न पडलाय की भविष्यात सोन्याची किंमत किती कमी होईल? कारण मागच्या २ वर्षांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त रिटर्न मिळाले होते.

जानेवारी २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम म्हणजेच १ तोळं ५,५९५ डॉलर इतकी होती. त्याचवेळी भारतातसुद्धा १० ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास १.७९ लाख रुपयांपर्यंत गेली होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात सतत घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे तेजीचा काळ संपला का? असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडला आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नुकतेच व्याजाचे दर ३.५ ते ३.७५ टक्क्यांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर यावर्षी व्याजदर कपातीचे संकेत मागे घेतले आहेत. गरज पडेल्यास दरवाढीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे डॉलर मजबूत झाला आणि सोन्यात नफावसुली वाढलेली पाहायला मिळाली. तर दुसरीकडे भारत सरकारने सोन्यावरचे आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले त्यामुळे सराफा बाजारात याचा परिणाम जाणवला.

ऑल बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांच्या मते, सोन्याचा भाव आणखी घसरून १० ग्रॅममागे १.२० लाख रुपयांपर्यंत येऊ शकतो. तर मागच्या काही दिवसांत सोन्याने उंच्चाक गाठला होता. प्रत्येक पाच ते ७ वर्षांनी मोठी घसरण होत असते. यावेळीसुद्धा ४० टक्क्यांहून जास्त करेक्शनची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दागिन्यांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी झालेलीही पाहायला मिळतेय.

तसेच काही तज्ज्ञ ही घसरण तात्पुरती असल्याचंही सांगतायेत. जानेवारीतल्या वाढलेल्या सोन्याचा भाव हा २४ टक्क्यांनी खाली असला तरी घाबरून विक्री होताना दिसत नाही. जगभरातल्या अनेक केंद्रीय बँका अजूनही सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्यावरचा विश्वास कायम असल्याचं मानलं जात आहे. वर्षाच्या शेवटी बाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता दिसतेय. तर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव १.७६ लाख रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT