Maharashtra's No 1 Marathi News Portal google
बिझनेस

No.1 Marathi News Portal: वाचकांची पहिली पसंती; सकाळ पुन्हा एक नंबरवर, डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा

Maharashtra's No 1 Marathi News Portal: डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेत ई-सकाळने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. विश्वासार्ह बातम्या आणि दर्जेदार कंटेंटमुळे वाचकांची पहिली पसंती ठरला आहे.

Sakshi Sunil Jadhav

डिजिटल युगात आता वाचण्यापेक्षा पाहणं पसंत करत असताना सकाळने वाचकांना आकर्षित केले आहे. सकाळच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वाचकांची संख्या वाढत आहेत. आनंदाची बाब म्हणजे सलग ६ महिने सकाळ पहिला क्रंमाकावर आहे. कॉमस्कोर मल्टी- प्लॅटफॉर्मच्या ताज्या आकडेवारीनुसार ई-सकाळ (esakal.com) )सर्वात जास्त आणि पहिल्या क्रमांकाचे न्यूज पोर्टल आहे.

ई-सकाळमध्ये गोमंतक, साम, अॅग्रोवन, सकाळ असे अनेक ऑनलाइन वेब पोर्टलचाही समावेश आहे. वेळोवेळी ताज्या घडामोडी देण्यासाठी ई-सकाळ नेहमीच पहिले ठरले. कॉमस्कोर मल्टी- प्लॅटफॉर्मच्या ताज्या आकडेवारीनुसार सकाळला तब्बल ६.२ कोटी युजर्स मिळाले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेल्या मल्टिमीडिया कंटेटमुळे वाचकांचा प्रतिसाद वाढला आहे.

वाचकांना यामध्ये सगळ्या क्षेत्रातल्या घडामोंडींची ताजी माहिती दिली जाते. यात सरकारचे नियम, वाहतूक व्यवस्था, हवामानाचा अंदाज, वाहतूक कोडींची माहिती, राजकारणातल्या घडामोडी, लाइफस्टाइल, मनोरंजन, बिझनेस, नवनवीन योजना अशा सर्व प्रकारच्या बातम्या ई- सकाळ वेळोवेळी वाचकांना पुरवतं.

ताज्या आकडेवारीनुसार, ई-सकाळने इतर प्रमुख मराठी वृत्तसंस्थांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ई-सकाळने डिजिटल क्षेत्रात सातत्याने केलेली गुंतवणूक, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या, विविध विषयांवरील दर्जेदार कंटेच तसेच झटपट ब्रेकींग बातम्यांचे धोरणामुळे ई सकाळला ही आघाडी मिळाल्याचे मानले जात आहे.

सोशल मीडियाचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. त्यावर सतत सक्रिय राहून, ताज्या घडामोडींचे अपडेट्स घेऊन आणि विश्वासार्ह पत्रकारिता करून ई-सकाळ पहिले आले आहे. तसेच डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे प्रादेशिक भाषांमधील पत्रकारितेला नवे व्यासपीठ मिळाले आहे. मराठी ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता याचीच साक्ष देते. वाचकांसाठी हा प्लॅटफॉर्म ताज्या माहितीचा खजिना आहे असं आपण म्हणू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty liver disease: लिव्हरवर चरबी जमा झालीये? हे 5 बदल करा, मेणासारखं वितळेल फॅट

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

Green leafy vegetables: 'ही' हिरवी पानं ठेवतील तुम्हाला फिट आणि निरोगी; रोजच्या आहारात आजच करा या पालेभाज्यांचा समावेश

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT