Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकालाच इच्छा असतात, स्वप्न असतात. ती पूर्ण व्हायला अनेकजण प्रयत्नही करतात. मुंबईत कधीही न आलेल्यांच एक आवडीचं स्वप्न ते म्हणजे ताज हॉटेल पाहणं. पण तुम्हाला याच्या एका खोलीचं १९६६ मध्ये किती भाडं होतं हे माहितीये का?
सध्या सोशल मीडियाच्या एका Reddit या प्लॅटफॉर्मवर एका युजरने ताज महाल हॉटेलचं 1966 सालातलं बिल शेअर केलं आहे.
१० जानेवारी १९६६ साली ताज हॉटेलमध्ये एका दिवसाच्या खोलीचा रेंट हा ११६. ७० पैसे होता. त्याकाळी ही रक्कम खूप मोठी मानली जात होती.
१९६० साली सोन्याचा दर खूप कमी होता. त्या वेळी १२७ रुपयांत १० ग्रॅमपेक्षा जास्त सोनं मिळत होतं.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाशेजारचं हे हॉटेल १९०३ मध्ये सुरू झालं. त्यानंतर ते देशातलं प्रतिष्ठित हॉटेल म्हणून ओळखण्यात आलं.
सध्या ताज महल पॅलेसमधील स्टँडर्ड रूमचे भाडं जवळपास २२५०० रुपयांपासून ५०००० रुपयांपर्यंत असू शकतं.
हॉटेलमधील प्रीमियम आणि VIP सूट्ससाठी एका रात्रीचा खर्च लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हंगाम, खोलीचा प्रकार आणि विशेष कार्यक्रमांनुसार दर बदलले जातात.