WhatsApp Holi celebration google
बिझनेस

WhatsApp Update: यंदाच्या होळीला उधळा 'व्हॉट्सअ‍ॅप रंग'; Photo Sticker ते व्हॉईस चॅटपर्यंत धम्माल फीचर होणार अपडेट

WhatsApp Holi 2026 Update: यंदाच्या होळीसाठी व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉईस चॅट, म्युझिक स्टेटस, फोटो स्टिकर, शेड्युल कॉल आणि स्मार्ट ग्रुप फीचर्स अपडेट केले आहेत. आता होळी सेलिब्रेशन अधिक सोपं, रंगतदार आणि इंटरॅक्टिव्ह होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

होळी आली की सोबत येते ती रंगांची उधळण, अचानक ठरलेले प्लॅन्स, ग्रुप चॅट्सचा कल्ला आणि रंगात न्हाऊन निघालेल्या आठवणी. पार्टीचं प्लॅनिंग असो किंवा रंगात माखलेले सेल्फी शेअर करणं, या होळीच्या प्रत्येक क्षणात व्हॉट्सॲप तुम्हाला मित्र-परिवाराच्या अधिक जवळ ठेवेल.

व्हॉट्सॲपच्या मदतीने तुमची होळी अशी करा अधिक खास:

व्हॉईस चॅट (Voice Chat) मेसेजची कटकट सोडा, गप्पांतून प्लॅनिंग करा!

होळीचं प्लॅनिंग करताना ग्रुपवर मेसेजचा पाऊस पडतोय? आता सारखं टाईप करण्याची गरज नाही. ग्रुपमध्ये Voice Chat सुरू करा आणि जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकजण त्यात सामील होऊ शकेल. जागा ठरवणं असो, गुजिया कोण आणणार हे ठरवणं असो किंवा गाण्यांची लिस्ट — कोणताही व्यत्यय न येता झटपट निर्णय घ्या.

म्युझिकसह स्टेटस (Status with Music): रंगांना देऊया सुरांची साथ

होळी फक्त डोळ्यांनी बघायची नसते, ती मनापासून अनुभवायची असते. तुमच्या लाडक्या रंगांच्या फोटोंना किंवा स्लो-मोशन व्हिडीओला Music Icon वापरून तुमच्या आवडत्या सणासुदीच्या गाण्याची जोड द्या. आता तुमचे मित्र तुमचं स्टेटस फक्त पाहणार नाहीत, तर त्या गाण्यावर तुमच्यासोबत थिरकतीलही!

शेड्युल कॉल्स (Schedule Calls): रंगांची उधळण होण्याआधीच भेटा!

होळीच्या दिवशी सगळे मित्र एकत्र येणार असतील, तर त्याचं नियोजन आधीच करा. व्हॉट्सॲपच्या Calls tab मध्ये जाऊन '+' वर टॅप करा आणि Scheduled Call सेट करा. यामुळे वेळेवर सगळ्यांना नोटिफिकेशन मिळेल. जे लांब आहेत त्यांनाही या व्हिडीओ कॉलद्वारे उत्सवात सामील करून घेता येईल. बनवा आणि Event Reminders सेट करा, जेणेकरून कोणीही पार्टी किंवा कॉल विसरणार नाही.

ग्रुप चॅट्स (Group Chats): सेलिब्रेशनची नवी पद्धत

आता तुमचे ग्रुप चॅट्स अधिक 'स्मार्ट' झाले आहेत. Member Tags वापरून ग्रुपमध्ये तुमची भूमिका ठरवा (उदा. होस्ट, डीजे किंवा स्नॅक्स-इन-चार्ज). एखाद्या मेसेजचा झटपट Text Sticker

स्टेटसचे नवे अवतार: प्रत्येक रंगाची वेगळी गोष्ट

तुमच्या होळीच्या आठवणी आता एका फोटोत मावणार नाहीत. Layout फीचर वापरून ६ फोटोंचा कोलाज बनवा किंवा आपल्या आवडत्या फोटोचा Photo Sticker तयार करा. इतकंच नाही, तर 'Add Yours' वापरून एक साखळी सुरू करा आणि तुमचे मित्र होळी कशी साजरी करत आहेत हे एकाच ठिकाणी पहा.

गल्लीतल्या सेलिब्रेशनपासून ते सातासमुद्रापार असलेल्या कुटुंबापर्यंत, होळी म्हणजे एकत्र येण्याचा सण. तुम्ही प्रत्यक्ष रंगात खेळत असाल किंवा स्क्रीनवरून शुभेच्छा देत असाल, व्हॉट्सॲप तुमच्या मदतीला सदैव आहे.

यंदाची होळी, व्हॉट्सॲपच्या सोबतीने करा अधिक उजळ, अधिक बोलकी आणि अधिक रंगतदार!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT