Diwali Muhurat Trading 2023 Saam Tv
बिझनेस

Muhurat Trading म्हणजे काय? यावेळी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ कधी आणि किती वाजताची आहे?

Muhurat Trading म्हणजे काय? यावेळी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ कधी आणि किती वाजताची आहे?

Satish Kengar

Diwali Muhurat Trading 2023:

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी मुहूर्त ट्रेडिंगबद्दल ऐकले असेलच. दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग केली जाते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी याचं खूप महत्त्व आहे. या दिवशी व्यापाऱ्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात होते. व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दिवसापासून सुरु होते.

दिवाळी सणात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे उगमस्थान मानलं जाणारं शेअर बाजार काही वेळेसाठी उघडलं जातं आणि ट्रेडिंग केली जाते. यालाच मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. जी संध्याकाळी 1 तास केली जाते. याची वेळ आधीच सांगितली जाते. परंपरेनुसार या वेळीही मुहूर्ताची खरेदी-विक्री होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी मुहूर्त ट्रेडिंग केली जाते...

मुहूर्त ट्रेडिंग ही केवळ प्रतीकात्मक ट्रेंडिग असते. या काळात चांगल्या वर्षाच्या इच्छेनेच शेअर्समध्ये पैसे गुंतवले जातात. यामध्ये गुंतवणूकदार जास्त खरेदी करत नाहीत, तर काही शेअर्समध्ये थोडी गुंतवणूक करतात, जेणेकरून एक परंपरा पुढे नेली जाईल. या दिवशी फार कमी लोक शेअर्स विकतात. मुहूर्ताच्या खरेदी-विक्रीला फारसे व्यावसायिक महत्त्व नाही, पण त्याला प्रतीकात्मक महत्त्व आहे.  (Latest Marathi News)

विक्रम संवत 2080 सुरू होईल

या वर्षी विक्रम संवत 2080 ची सुरुवात मुहूर्त ट्रेडिंगने होणार आहे. यावेळी मुहूर्त ट्रेडिंगवर बाजार बाजार चांगली मुसंडी मारले, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी बाजारात चांगली वाढ झाली आहे. काही प्रसंग वगळता, बहुतेक वेळा मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान बाजार हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे. गेल्या 10 पैकी 7 वेळा बाजारात वाद पाहायला मिळाली, तर 3 वेळा तोटा झाला आहे.

यावेळी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ काय आहे?

नवीन वर्ष आणि दिवाळीत BSE आणि NSE वर एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र (मुहूर्त ट्रेडिंग) असेल. हे एक प्रतीकात्मक व्यापार सत्र आहे. दिवाळीला संध्याकाळी रविवारी 6:15 ते 7:15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT