Apaar ID Saam Tv
बिझनेस

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारे अपार आयडी नेमकं आहे तरी काय? उपयोग काय?

What Is Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला एक अपार आयडी दिला जाणार आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक १२ अंकी नंबर मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याची सर्व माहिती असणार आहे.

Siddhi Hande

शैक्षणिक धोरण २०२० मध्ये काही बदल केले गेले आहेत. या धोरणात मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अपार कार्ड मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे अपार कार्ड म्हणजे स्वतः चे वेगळे ओळखपत्र असेल.

अपार कार्डमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती ऑनलाइन पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे. तसेच डिजिलॉकरदेखील दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. एक देश, एक विद्यार्थी ओळखव या संकल्पनेवर हे अपार आयडी आधारित आहे. (Apaar ID For Students)

अपार आयडी

अपार आयडी म्हणजे ऑटोमेटेड अककॅडमिक अकाउंट रजिस्ट्री. पूर्व प्राथमिक ते कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे कार्ड मिळणार आहे. यात १२ अंकी युनिक नंबर असणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एका ठिकामी सेव्ह करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्याची सर्व माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित राहावी, त्यामुळे हा उपक्रम राबवला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे म्हणजेच दहावी-बारावीचा निकाल, दाखला अशा सर्व गोष्टी सेव्ह असणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त नंबर टाकून या गोष्टी लगेच उपलब्ध होतील. जर एखाद्या विद्यार्थ्याला नवीन शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना सर्व कागदपत्रे घेऊन जायची गरज नाही. त्यांना फक्त तुमचा अपार आयडी क्रमांक विचारला जाईल. (What Is Apaar ID)

अपार आयडी हे शाळा किंवा महाविद्यालये बनवणार आहे. परंतु यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. शिक्षक हे पालकांची संपर्क साधणार आहे. त्यानंतर काही माहिती विचारली जाणार आहे. त्यानंतर तुमचे अपार कार्ड बनवले जाईल.

डिजिलॉकरमध्ये तुमची सर्व कागदपत्रे सेव्ह लाहणार आहे. क्लाउडवर आधारित तुमच्या कागदपत्रांसाठी खास जागा उपलब्ध होणार आहे. तुमची माहिती, प्रमाणपत्रे सर्वकाही सेव्ह केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT