Voter ID Saam Tv
बिझनेस

Voter ID: आता वोटर आयडी अन् आधार लिंक करणे अनिवार्य; कधीपासून सुरु होणार प्रोसेस; जाणून घ्या

Voter ID Aadhaar Card Link: आता निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

Siddhi Hande

भारतात राहण्यासाठी रहिवासी असल्याचा पुरावा असणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुमच्याकडे अनेक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. तुम्हाला नेहमी काही न काही कागदपत्रांची गरज ही पडतेच. अन्यथा तुमची अनेक कामे होत नाही. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, वोटर आयडीचा समावेश आहे. ही कागदपत्रे खूप महत्त्वाची आहेत. आता तुम्हाला वोटर आयडी तुमच्या आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे.

मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. यासाठी प्रत्येकाकडे वोटर आयडी असणे गरजेचे आहे. आता वोटर आयडीबाबत मोठी अपडेट जारी केली आहे. ज्यामध्ये वोटर आयडीला आधारशी लिंक करावे लागणार आहे.

वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक कसं करायचं? (How To Link Voter ID And Aadhaar Card)

तुमचे मतदान कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य असणार आहे. मात्र, यासाठी प्रोसेस काय असणार, हे आयडी लिंक कसं करायचं याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतेही निर्देश जारी केलेले नाही. लवकरच निवडणूक आयोग याबाबत माहिती देणार आहे.

पॅन कार्ड अन् आधार कार्ड लिंक असणे गरजेचे

पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे. तुमच्या सर्व बँकेच्या कामांसाठी किंवा टॅक्सबाबतच्या कामांसाठी हे दोन कागदपत्रे लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते.

वोटर आयडी आणि आधार कार्ड लिंक केल्याने बोगस मतदारांना आळा बसणार आहे. एका वोटर आयडीवरुन एकाच व्यक्तीला मतदान करता येणार आहे. यामुळे निवडणूक आयोगाला मदत होणार आहे. गोपनियता राखावी आणि बोगस मतदान कमी व्हावे, यासाठी हे पाऊल उचलले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका

Grooming Tips For Men: दाढी करण्यासाठी गंजलेला किंवा जुना रेझर वापरण्याचे गंभीर धोके, पुरूषांनी वेळीच घ्या काळजी

Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या बड्या नेत्याच्या जीवाला धोका, घर अन् ऑफिसची ३ वेळा रेकी; सलमान खानसोबत जवळचे संबंध

Diwali Ladoo Recipe : रव्याचे लाडू कडक होतात? 'या' सोप्या ट्रिकने बनवा मऊसूत लाडू, तोंडात टाकताच विरघळतील

Shocking : संभाजीनगर हादरले! बाप लेकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

SCROLL FOR NEXT