Vi recharge  Saam tv
बिझनेस

VI Recharge Plan : ग्राहकांना मोठा झटका! JIO आणि Airtel नंतर आज VI चे रिचार्ज महागले, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जीओ आणि एअरटेलनंतर आता ४ जुलैापासून व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड आमि पोस्टपेड रिचार्ज प्लान महागले आहेत. व्होडाफोन आयडियाच्या आधीच जीओ आणि एअरटेलचे रिचार्ज महागले आहेत. व्होडोफान आयडियाचे १३ रिचार्ज प्लान महागले आहेत. कंपनीने मासिक प्लानपासून एक वर्षांचे रिचार्ज प्लान महाग केले आहेत. जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

२८ दिवसांचा व्होडाफोन रिचार्ज प्लान

१७९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, २जीबी डेटा आणि ३०० एसएमएसचे अनेक फायदे मिळतात. ४ जुलैपासून हा प्लान १९९ रुपयांना झाला आहे.

२६९ रुपयांचा रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, १ जीबी/ दिवस, १०० एसएमएस/ दिवस अशी ऑफर आहे. या रिचार्ज प्लान हा २९९ रुपयांना आहे.

२९९ रुपयांच्या रिजार्ज प्लानमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉल, १०० एसएमएस/दिवस आणि दिवसाला १.५ जीबी डेटाची ऑफर आहे. हा रिचार्ज प्लान आता ३४९ रुपयांना झाला आहे.

३१९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे. तसेच अनलिमिटेड कॉल २ जीबी/दिन डेटा आणि १०० एसएमएस/दिवस अशी ऑफर आहे. हा रिचार्ज ४ जुलैपासून ३७९ रुपयांचा झाला आहे.

५६ दिवसांच्या व्हीआयचा रिचार्ज प्लान

दिवसाला १.५ जीबी डेटा + अनलिमिटेड कॉलिंग + डेली १०० एसएमएस अशी ऑफर आहे. या रिचार्जची किंमत ४७९ रुपये आहे. आता या रिचार्जची नवी किंमत ५७९ रुपये आहे.

दिवसाला २ जीबी डेटा + अनलिमिडेट कॉलिंग + डेली १०० एसएमएस अशी ऑफर आहे. या रिचार्जची किंमत आधी ५३९ रुपये होती. आता या रिचार्जची किंमत ६४९ रुपये झाली आहे.

८४ दिवसांचे व्होडाफोन रिचार्ज प्लान

८४ दिवसांच्या रिचार्ज प्लानमध्ये ६ जीबी डेटा आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आहे. दिवसाला एसएमएस ३०० आहे. सुरुवातीला या रिचार्जची किंमत ४५९ रुपये होती. आता या रिचार्जची नवी किंमत ही ५०९ रुपये इतकी आहे.

८४ दिवसांच्या रिचार्ज प्लानमध्ये १.५ जीबी डेटा आहे. या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे. तसेच दिवसाला १०० एसएमएस आहेत. तर रिचार्जची किंमत ७१९ रुपये आहे. तर आता या रिचार्जची किंमत ८५९ रुपये इतकी आहे.

८४ दिवसांच्या रिचार्जमध्ये २ जीबी डेटा दिवसाला मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आहे. दिवसाला १०० एसएमएस आहेत. तर ८३९ रुपयांचा रिचार्ज आता ९७९ रुपयांमध्ये मिळत आहे.

३६५ दिवसांचा रिचार्ज प्लान

१,७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. अनलिमिटेड कॉलिंग, २४ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस अशी ऑफर आहे. आता या रिचार्जची किंमत १९९९ रुपये झाली आहे.

२९८८ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आहे. दिवसाला १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळत आहे. आता या रिचार्जची किंमत ३४९९ रुपये झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT