Vodafone Idea Independence Day offer 
बिझनेस

Vi ची धासू ऑफर; ग्राहकांना मिळेल 50GB डेटा, Disney+ Hotstar आणि Amazon Prime Videoचा आनंद

Bharat Jadhav

स्वातंत्र्यदिनानिमित्त वोडाफोन आयडियाने एक धमाकेदार ऑफर आणलीय. या ऑफरमध्ये कंपनी सहा महिने आणि एक वर्षाच्या रिचार्ज प्लॅनवर अतिरिक्त आणि ओटीटी फायदे मिळणार आहे. ही ऑफर १३ ते २८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. Vodafone Idea ची ही ऑफर १७४९, ३४९९, ३६२४ आणि ३७९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर मिळणार आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध दैनिक डेटा व्यतिरिक्त कंपनी ५० जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा देत आहे.

जर तुम्ही सहा महिन्यांचा प्लॅन घेतला तर तुम्हाला ४५ दिवसांसाठी अतिरिक्त डेटा मिळेल आणि जर तुम्ही एक वर्षाचा प्लॅन घेतला तर तुम्हाला ९० दिवसांसाठी अतिरिक्त डेटा मिळेल. हा डेटा तुमच्या प्लॅनमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या दैनिक डेटाव्यतिरिक्त मिळेल आहे. दोन्ही दोन्ही ऑफर २८ ऑगस्टपर्यंतच राहतील.

Vodafone Idea एक वर्षाच्या प्लॅनवर Disney + Hotstar आणि Amazon Prime Video चे एक वर्ष मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. जर तु्म्ही वोडाफोन आयडियाच्या अॅपवरून रिचार्ज करत असाल तर तुम्हाला एका वर्षाच्या प्लॅनवर सुट मिळणार आहे. ३४९९ रुपये, ३६९९ रुपये आणि ३७९९ रुपयांच्या प्लॅनवर तु्म्हाला क्रमशः ५०रुपये, ७५ रुपये आणि १०० रुपयांची सूट मिळणार आहे.

काय आहेत प्लॅन

१,७४९ रुपये १८० दिवस १.५GB/दिवस अमर्यादित - ४५ दिवसांसाठी ३०GB अतिरिक्त डेटा मिळतो. ३, ४९९ रुपये Vi app ची किमत ३६५ दिवस मिळेल फायदा प्रत्येक दिवशी १.५जीबी अमर्यादित ९० दिवसापर्यंत ५० जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. ३,६२४ रुपयांच्या रिचार्जवर प्रत्येक दिवशी १.५ जीबीचा अतिरिक्त डेटा वापरायला मिळेल. यात एका वर्षासाठी Disney+ Hotstar mobile subscription चा लाभ मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT