Vivo T3 5G Saam Tv
बिझनेस

Vivo कमी किंमतीत घेऊन येत आहे फास्टेस्ट 5G स्मार्टफोन, मिळणार जबरदस्त फीचर्स

Vivo T3 5G: फोन निर्माता कंपनी Vivo ने काल घोषणा केली की, Vivo T3 5G स्मार्टफोन 21 मार्च 2024 रोजी भारतीय बाजारात लॉन्च करणार.

साम टिव्ही ब्युरो

Vivo T3 5G India Launch Date:

फोन निर्माता कंपनी Vivo ने काल घोषणा केली की, Vivo T3 5G स्मार्टफोन 21 मार्च 2024 रोजी भारतीय बाजारात लॉन्च करणार. डिव्हाइसची मायक्रोसाइट आधीच फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आली आहे. यातच कंपनीने या फोनचा प्रोसेसर आणि कॅमेरा याबद्दल माहिती जाहीर केली आहे.

फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटने आज अधिकृतपणे खुलासा केला आहे की, Vivo T3 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरसह येईल. या चिपसेटसह डिव्हाइसला 734K+ AnTuTu स्कोअर मिळाला आहे. AnTuTu स्कोअरवर आधारित, स्मार्टफोन हा या सेगमेंटमधील सर्वात वेगवान फोन असल्याचा दावा केला जात आहे. AnTuTu स्कोअर टेस्ट 8GB + 256GB व्हेरिएंटवर करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किती असू शकते किंमत?

वीवोचा हा फोन 20,000 ते 25,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. टेक एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, Vivo T3 5G ची किंमत 23 हजार रुपयांपेक्षा कमी असेल. असं असलं तरी याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.  (Latest Marathi News)

Vivo T3 5G स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1800 nits पीक ब्राइटनेससह 6.67″ FHD+ AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन 8GB/128GB आणि 8GB/256GB अशा दोन स्टोरेज पर्यायांसह येईल. या फोनमध्ये 8GB व्हर्च्युअल रॅम देखील असेल. यात ब्लूटूथ 5.3 व्हर्जन पाहायला मिळू शकतो.

कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर यात 50MP OIS Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा आणि 2MP Bokeh कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सेल्फी शूटरमध्ये 16MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 5000 mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. जी 44W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT