enjoy this festive season yandex
बिझनेस

Best Ways to Enjoy Festive Season: विमानप्रवासाचा घ्‍या आनंद, स्‍मार्टपणे भरा देय! फ्लाइट्सवर सर्वोत्तम डिल्‍स मिळवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

enjoy this festive season: व्हिसा यंदा सणासुदीच्‍या काळात फ्लाइट्सवर सर्वोत्तम डिल्‍सचा आनंद घेण्‍यासाठी सांगत आहे उपयुक्‍त टिप्‍स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सणासुदीच्‍या काळाला उत्‍साहात सुरूवात झाली आहे आणि पर्यटक दिवाळी गेटवेजपासून वर्षाखेर सुट्ट्यांपर्यंत पुढील साहसी प्रवासासाठी विमानाने प्रवास करण्‍यास सज्‍ज आहेत. खिशावर अधिक भार न देता प्रवासाचा आनंद घेण्‍यासाठी खाली काही स्‍मार्ट टिप्‍स देण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या यंदाच्‍या सीझनमध्‍ये तुम्‍हाला मोठी बचत करण्‍यास मदत करू शकतात:

1. प्राइस अलर्ट्स सेट करा आणि लवकर बुकिंग करा: विमानप्रवास दरांमध्‍ये होणाऱ्या बदलांवर देखरेख ठेवण्‍यासाठी तुमच्‍या इच्छित फ्लाइट्सकरिता प्राइस अलर्ट्स सेट करा. तुम्‍हाला अधिक पर्याय मिळू शकतात, तसेच तुम्‍ही सर्वोत्तम डिल्‍स सुनिश्चित करू शकता आणि सुट्टीच्‍या कालावधीपूर्वी दरांमध्‍ये होणारी वाढ टाळू शकता.

2. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्सचा फायदा घ्‍या: तुमचे क्रेडिट कार्ड बहुमूल्‍य प्रवास सोबती आहे. व्हिसा नेटवर्कवरील अनेक को-ब्रॅण्‍डेड कार्ड्स सूट किंवा मोफत अपग्रेड्स, तसेच पॉइण्‍ट्स किंवा माइल्‍स असे अनेक लाभ देतात. या लाभांचा फायदा घ्‍या आणि उत्‍साहात प्रवासाचा आनंद घेत भावी ट्रिप्‍ससाठी पैशांची बचत करा.

3. नो-कॉस्‍ट ईएमआय पर्यायांचा विचार करा: फ्लाइट बुकिंगसाठी नो-कॉस्‍ट ईएमआय पर्याय तुम्‍हाला आटोपशीर, व्‍याज-मुक्‍त हप्‍त्‍यांमध्‍ये पेमेंट्स करण्‍याची सुविधा देतात आणि हप्‍ता देखील तुम्‍हाला परवडणारा असतो.

4. कनेक्‍टींग फ्लाइट्सचा अवलंब करा: लांबच्‍या अंतराच्‍या प्रवासाकरिता संभाव्‍य कमी दरांसाठी थेट फ्लाइट्सऐवजी कनेक्‍टींग फ्लाइट्सची निवड करा, ज्‍यामुळे तुम्‍हाला बजेटचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्‍थापन करता येईल. काळजीपूर्वक प्रवास गंतव्‍याचे मूल्‍यांकन करा आणि तुमचे वेळापत्रक व बजेटला साजेशा कनेक्‍टींग फ्लाइट्सची निवड करा.

5. उच्‍च कन्‍वर्जन दर टाळा: आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी कमी कन्‍वर्जन दर देणारे मल्‍टी-करण्‍सी फोरेक्‍स कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्सचा वापर करा. या लहान समायोजनामुळे तुम्‍हाला मोठ्या प्रमाणात बचत करण्‍यास मदत होईल, ज्‍यामुळे तुम्‍ही प्रवासादरम्‍यान धमाल अनुभवांवर अधिक खर्च करू शकाल.

या उपयुक्‍त टिप्‍ससह तुम्‍ही यंदा सणासुदीच्‍या काळात बजेट व धमाल अनुभवांबाबत तडजोड न करता आत्‍मविश्‍वासाने प्रवास करू शकता.

Edited By: Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress third list : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा

Amit Thackeray : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, VIDEO

MS Dhoni: आयपीएल विश्वातील सर्वात मोठी घडामोड; एमएस धोनी CSK मधून खेळणार?, पडद्यामागं काय घडलं?

Nawab Malik : अजित पवारांची मनधरणी अपयशी; नवाब मलिक निवडणूक लढण्यास ठाम, कुठून भरणार अर्ज? VIDEO

Love Rashifal: शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे ५ राशींच्या लव्ह लाईफमध्ये येणार आनंदी आनंद

SCROLL FOR NEXT