Fact Check News Saam tv
बिझनेस

Viral News: बँकेनं भुतांना दिलं लाखोंचं कर्ज? सरकारी बँकेलाच भुतांनी गंडवलं?

Fact Check News: एका बँकेनं चक्क भुतानांच लाखोंचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय. भुतांना कसं काय कर्ज दिलं?

Sandeep Chavan

एका बँकेनं चक्क भुतानांच लाखोंचं कर्ज दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. लाखो रुपयांचं कर्ज बँक कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय. भुतांना कसं काय कर्ज दिलं? याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

ऐकलंत बँकेनं भुतांना लाखो रुपयांचं कर्ज दिलंय, असा दावा करणारा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सरकारी बँकेनं चक्क भुतांनाच कर्ज दिल्याचा दावा या व्यक्तीने केलाय. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या जगात भूतच नाही, मग कर्ज देण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय?

भुतांनी कर्ज कसं काय घेतलं हाच प्रश्न तुमच्या मनात असेल, मात्र असं होऊ शकतं का? भुतांना कर्ज कसं काय दिलं? हे नक्की प्रकरण काय आहे याची आम्ही पडताळणी सुरू केली. सगळ्यात आधी व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती कुठली आहे याचा शोध घेतला. त्याने हा व्हिडिओ का व्हायरल केलाय याची आम्ही माहिती मिळवली. त्यावेळी एकाहून एक असे धक्कादायक खुलासे झाले. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

ही घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरची आहे

एसबीआय बँकेत मृत कर्मचाऱ्यांची पेन्शन सुरू होती

बँकेतील कर्मचारी आणि कॅन्टीन बॉयची मिलीभगत

17 मृत व्यक्तींच्या नावाने 70 लाखांचं कर्ज घेतलं

बँक कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन बॉयला फक्त 3 लाख दिले

बाकीचे सगळे पैसे बँक कर्मचाऱ्यांनी उकळले

बँक कर्मचाऱ्यांनी यासाठी मृत पेन्शनधारकांचे कागदपत्र जमवले आणि त्यांच्या नावाने तब्बल 70 लाखांचं कर्ज काढलं. तसंच मृत कर्मचाऱ्यांच्या नावाने पेन्शनही उकळत होते अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत बँकेनं मृतांच्या नावावर कर्ज दिल्याचा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: १०० ते १५० रूपयांमध्ये खरेदी करा युनिक आणि आकर्षक डिझाईन्सचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Maharashtra Live News Update: भाजप आमदार सुरेश धस यांनी गायले गीत

Puffy Eyes Morning: सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसतेय? किडनीच्या समस्येची ही गंभीर सुरुवात असू शकते

आखाती युद्धाचा परिणाम! डॉलरसमोर रुपया कोसळला; 95.22 वर ऐतिहासिक नीचांक|VIDEO

Viral news: समुद्र किनाऱ्यावर घडली मोठी दुर्घटना; अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT