Vehicle Insurance Saam Tv
बिझनेस

Vehicle Insurance: वाहन विम्याच्या नियमांत मोठा बदल! १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू; कार-बाईक मालकांना काय फायदा?

Vehicle Insurance: १५ डिसेंबर २०२६ पासून कार आणि दुचाकी विम्याचे नियम बदलणार आहेत. IRDAI ची नवीन चार नियम लागू करण्यात येणार आहेत. ग्राहकांना काय फायदा होईल जाणून घ्या.

Shruti Vilas Kadam

Vehicle Insurance: कार, बाईक किंवा स्कूटर घेतल्यानंतर त्याचा विमा काढणे गरजेचे असते. आता या वाहन विम्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. IRDAI म्हणजेच भारतीय विमा नियामक संस्थेने वाहन विम्यासाठी नवीन चार प्रकारची नियम लागू केले आहेत. हे नियम १५ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार वाहन मालकांना त्यांच्या गरजेनुसार विमा निवडता येणार आहे. म्हणजेच, कोणता विमा घ्यायचा आणि कोणत्या सुविधांसाठी पैसे भरायचे, हे ग्राहक स्वतः ठरवू शकतील. यामुळे विमा घेताना ग्राहकांना अधिक सोयीस्कर होणार आहे.

वाहन विम्याचे चार प्रकार कोणते?

नवीन नियमानुसार वाहन विम्याचे चार भाग करण्यात आले आहेत.

१. थर्ड पार्टी विमा (Third Party Insurance)

हा विमा घेणे अनिवार्य असेल. तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीला, तिच्या वाहनाला किंवा मालमत्तेला नुकसान झाले, तर त्याची भरपाई या विम्यातून मिळते.

२. लीगल लायबिलिटी कव्हर (Legal Liability Cover)

या विम्यामुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना किंवा दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला अपघात झाल्यास वाहन मालकाची कायदेशीर जबाबदारी कव्हर होते.

३. पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर (Personal Accident Cover)

वाहन मालकाला अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळण्यासाठी हे कव्हर असते. याबाबतचे सध्याचे नियमच पाळावे लागतील.

४. ओन डॅमेज कव्हर (Own Damage Cover)

तुमच्या स्वतःच्या वाहनाचा अपघात झाला, गाडीला आग लागली किंवा गाडी चोरीला गेली, तर या विम्यामुळे नुकसान भरून काढण्यास मदत होते.

कोणता विमा घेणे बंधनकारक असेल?

नवीन नियमानुसार थर्ड पार्टी विमा घेणे अनिवार्य असेल. इतर विमा पर्याय ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडता येतील. मात्र, वाहन मालकांसाठी असलेले पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरसाठी सध्याचे नियम पाळावे लागतील.

विमा घेताना नवीन फॉर्म भरावा लागणार

आता विमा काढताना ग्राहकांना एक नवीन फॉर्म दिला जाणार आहे. याला 'कस्टमर ऑप्शन फॉर्म' असे म्हणतात. या फॉर्ममध्ये ग्राहकांना कोणत्या प्रकारचा विमा हवा आहे, हे निवडता येईल. तसेच विमा कंपन्यांना 'कस्टमर इन्फॉर्मेशन शीट' द्यावी लागेल. यामध्ये कोणत्या विम्यासाठी किती पैसे भरावे लागतील आणि त्यातून कोणते फायदे मिळतील, याची माहिती दिली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भीषण अपघात! बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना टेम्पोने चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: अंगणवाडी सेविकांचा रायगड जिल्हा परिषदेत ठिय्या

Nepal Tourism : भाततातून नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक की आधार कार्ड ? नेपाळ प्रवासाचे नियम जाणून घ्या

रेखा कोंडे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी; पुण्यातील मारहाण प्रकरणानंतर पक्षाचा निर्णय

Car & Bike Insurance Rules : सिग्नल तोडणाऱ्यांनो सावधान! आता इन्शुरन्ससाठी मोजावे लागतील जास्त पैसे?

SCROLL FOR NEXT