Vegetable Cultivation Tips saam Tv
बिझनेस

Vegetable Cultivation: शेतकऱ्यांनो! 'या' पद्धतीनं करा भाजीपाल्याची शेती; प्रत्येक हंगामात होईल दमदार कमाई

Vegetable Cultivation Tips: भाजीपाला शेती करण्यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे याची माहिती घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vegetable Cultivation:

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. परंतु शेतकरी शास्त्रोक्त तंत्राचा वापर करत रोपवाटिका करत नसल्याने त्यांना आर्थिक नुकसान होत असते. तसेच भाजीपाला शेतीमध्ये ऑर्गानिक भाजीपाला पिकवला तर उत्पन्नात अधिक वाढ होऊ शकते. दरम्यान भाजीपाला शेतीसाठी कोणत्या तंत्राचा वापर करावा याची माहिती घेऊया. (Latest Business News)

शेतकऱ्यांनी प्रो ट्रे तंत्र आणि पॉलिटनेल तंत्राचा वापर करून भाजीपाल्याची रोपे तयार केल्यास त्यांचे आर्थिक नुकसान कमी होते. व्यापारी पिकांऐवजी भाजीपाला शेती केली तर त्यांची आर्थिक भरभराट अधिक होत असते.

पॉलिटनेल तंत्र

भाजीपाला शेती करताना लागवड, रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, पीकांचे संरक्षण करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पॉलिटनेलमध्ये कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी, सिमला मिरची, टोमॅटोची लागवड करता येते. बियाणे पेरल्यानंतर पॉलिटनेल पांढऱ्या पॉलिथिनने झाकले जाते. पॉलीथिलीन २०० मायक्रॉनचे असावे. लागवड केल्यानंतर पॉलिटनेलला सांयकाळी पॉलिथीननं झाकून द्यावे. रात्रीच्यावेळी देखील हे झाकून द्यावे. जर तापमान २५ ते २६ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर दिवसा पॉलिथीन काढून टाकावे.

प्रो ट्रे तकनीक

प्रो ट्रेच्या तंत्राचा उपयोग करून भाजीपाला शेती केल्यानं शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ होत असतो. या तंत्राचा वापर केल्यानं यात पिकांना कमी कीड लागत असते. तसेच भाजीपालाचे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढत असते. व्यापारी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असाल तर हायब्रीडच्या वाणांचा वापर करावा.

भाज्यांच्या संकरित वाणांचे बियाणे अधिक महाग असल्याने त्यांची रोपे योग्य उगवणीबरोबरच दर्जेदार रोपे तयार होऊन कीड आणि रोगांपासून त्यांचे रक्षण होईल, असे तंत्र वापरावेत. यासाठी प्रो ट्रे तंत्र वापरावे. या तंत्रामुळे कोणत्याही हंगामात कोणत्याही भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

SCROLL FOR NEXT