UP Government Lifetime Free Bus Travel For Women Above 60 AI Image
बिझनेस

Free Bus Travel : सरकारची मोठी घोषणा! 'या' महिलांना करता येणार मोफत प्रवास; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Free Bus Travel Uttar Pradesh Government Scheme : उत्तर प्रदेशातील ६० वर्षांवरील महिलांना यूपी रोडवेजच्या सर्व बसमध्ये मोफत प्रवास देण्याची तयारी. योजनेसाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद.

Alisha Khedekar

  • ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी मोफत बस प्रवास

  • उत्तर प्रदेश परिवहनच्या सर्व बसमध्ये सुविधा लागू

  • २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

  • परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी योजनेची माहिती दिली

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी उत्तर प्रदेश परिवहन निगमच्या सर्व बसमध्ये आजीवन मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी याबाबत माहिती दिली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

परिवहन मंत्री दयाशंकर सिंह रविवारी बलिया येथे पोहोचले होते. तिखमपूर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन मिलन कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमादरम्यान दयाशंकर सिंह यांनी ज्येष्ठ महिलांसाठी मोफत बस प्रवासाच्या निर्णयाची माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना आयुष्यभर यूपी रोडवेजच्या सर्व बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा प्रस्ताव विधानसभेतही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना या निर्णयाचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सोमवारी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणता निर्णय घेतात, त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित होईल. त्यामुळे ज्येष्ठ महिलांसाठी ही सुविधा नेमकी कधीपासून लागू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारच्या मते, या सुविधेमुळे ज्येष्ठ महिलांना कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक तसेच आरोग्याशी संबंधित कारणांसाठी प्रवास करताना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई, ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

SCROLL FOR NEXT