US-Iran tensions: Brent crude prices above $70 in global market saam tv
बिझनेस

Petrol-Diesel Price: 'तो' एक निर्णय सर्वसामान्यांना 'महागा'त पडणार,पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार

Petrol-Diesel Price: अमेरिका-इराणमधील तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ७० डॉलर्सच्या पुढे गेला आहे, असून तो चार महिन्यांमधील अधिक आहे. संघर्ष वाढल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

Bharat Jadhav

  • अमेरिका-इराण तणावामुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडालीय

  • ब्रेंट क्रूडचे दर चार महिन्यांच्या उच्चांकावर आहे.

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर किमतींमध्ये तीव्र वाढ झालीय.

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता जागतिक तेल बाजारावर होतोय. गुरुवारी, सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाईची धमकी दिल्यानंतर किमतींमध्ये ही वाढ तीव्र वाढ झाल्याचं दिसत आहे.

ब्रेंट आणि WTIमध्ये मोठी वाढ

लंडनच्या बाजारात ब्रेंट नॉर्थ सी क्रूड २.४% वाढून ७०.०६ प्रति बॅरल डॉलर झाला आहे. दरम्यान अमेरिकेतील बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) देखील २.६% वाढून प्रति बॅरल ६४.८२ डॉलरवर पोहोचला. तज्ञांचे म्हणणे आहे की जर तणाव आणखी वाढला तर किमती आणखी वाढू शकतात.

इराणबाबत ट्रम्प यांचे कडक धोरण

ट्रुथ सोशल या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, इराणने त्यांच्या अणुकार्यक्रमाबाबत ताबडतोब चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली पाहिजे. कोणताही करार असा असावा ज्यामध्ये अण्वस्त्रांचा समावेश नसेल आणि तो सर्व पक्षांसाठी न्याय्य असेल. ट्रम्प यांनी इशारा दिला की जर इराणने वाटाघाटी केल्या नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

याबाबत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी अमेरिकेला स्पष्टपणे इशारा दिला आहे की, इराण कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला कठोरपणे प्रत्युत्तर देईल. यामुळे या दोन्ही देशात संघर्षाचे सावट निर्माण झाले आहे.

तेल पुरवठ्याच्या संकटाचा धोका

बाजारपेठ तज्ज्ञ डॅरेन नाथन यांच्या मते, जर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढला तर इराणच्या सुमारे ३ दशलक्ष बॅरलच्या दैनिक तेल उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय जगाच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेल आणि वायू टँकरची हालचाल विस्कळीत होऊ शकते.

भविष्यात तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. तज्ज्ञांचे मते, सध्या बाजारात भीतीची भावना आहे. शाब्दिक युद्ध तीव्र होत असताना, गुंतवणूकदार तेलाकडे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहत आहेत. यामुळेच ब्रेंट क्रूड चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दबाव वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

ZP Election: निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी करुन परीक्षा कशी द्यायची? शिक्षकांच्या मनात संभ्रम

Today Horoscope: या राशींसाठी आज नवीन ओळखी फायदेशीर ठरतील, जाणून घ्या राशीभविष्य

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

SCROLL FOR NEXT