Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! एक नाही तर दोन स्पर्धा परीक्षा क्रॅक; पहिल्याच प्रयत्नात झाल्या IPS; तनु सिंह यांचा प्रवास

Success Story Of IPS Tanoo Singh: आयपीएस तनु सिंह यांनी एक नाही तर दोन स्पर्धा परीक्षा पास केल्या आहेत. त्यांनी बीपीएससी आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अशीच मेहनत तनु सिंह यांनी केली. तनु सिंह या सध्या आयपीएस (IPS) पदावर कार्यरत आहेत. त्यांनी खूप मेहनत घेतली त्यानंतर त्यांना हे यश मिळालं आहे. त्यांनी फक्त यूपीएससी नव्हे तर BPSC परीक्षादेखील क्रॅक केली आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

तनु सिंह या उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील लहानश्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील रणजित सिंह हे आर्मीत कार्यरत होते. तर आई गृहिणी आहेत.

तनु सिंह यांचे शिक्षण (IPS Tanoo Singh Education)

तनु सिंह यांच्यासाठी यूपीएससी (UPSC) क्रॅक करण्याचा प्रवास हा सोपा नव्हता. त्यांनी घरापासून दूर राहून अभ्यस केला. त्यांनी प्रत्येक अडचणींव मात केली. तनु सिंह यांनी सुरुवातीचे शिक्षण गोरखपुरच्या कुडाघाट आर्मी स्कूलमधून घेतले. त्यांनी याच हायस्कूलमधील इंटकरमीडिएट परीक्षा पास केली. यानंतर त्यांनी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून बीएससी आणि फॉरेंसिक सायन्सची परीक्षा पास केली. त्यांनी फ्रेंच भाषेचाही कोर्स केला.

फ्रेंच भाषेचा कोर्स केल्यानंतर तनु यांनी सिविल सेवा परीक्षेची तयारी सुरु केली. यासाठी त्या घरापासून दूर पटना येथे राहिल्या. त्यांनी खूप मेहनतने बिहार पीसीएस परीक्षा पास केली.

तनु यांनी या सरकारी नोकरीसोबत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात ५४० रँक प्राप्त केली. त्या आज आयपीएस अधिकारी आहेत. तनु त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांच्या वडिलांना देतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमी सपोर्ट केला म्हणूनच त्यांनी हे यश मिळवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT