गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनल पेमेंट्स यांनी एक सामंजस्य करार केला आहे. हा करार UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) युजर्ससाठी एक भेट ठरू शकतो. कारण जागतिक पातळीवर UPI पेमेंट करणे शक्य होणार असून भारतीय पर्यटक किंवा परदेशात जाणाऱ्या भारतीयांना याचा मोठा फायदा होणार आहे.
NPCI ने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात भारताबाहेरील देशांमध्ये UPI चा प्रभाव वाढवण्यासाठी NPCI इंटरनॅशनल आणि Google Pay India यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत असल्याचं म्हटलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय होईल फायदा ?
Google Pay च्या मदतीने युजर्स जागतिक पातळीवर UPI पेमेंट करू शकणार आहेत.
भारतीय पर्यटकांना परदेशात जाणे सोपे होणार आहे.
भारताच्या UPI सारखी डीजिटल पेमेंटप्रणाली आणखी अनेक देशांमध्ये लागू करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
इतर देशांतील आर्थिक व्यवहारांची ब्लू प्रिंटही तयार करता येईल.
हा MOU UPI च्या जागतिक विस्ताराला बळकट करेल आणि विदेशी व्यापाऱ्यांना लाखो भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.
डीजिटल पेमेंट करण्यासाठी केवळ विदेशी चलन, क्रेडिट किंवा परदेशी चलन कार्डांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
आतापासूनच भारतातील Google Pay सह UPI ऑपरेटर अॅप्स वापरण्याचा पर्याय उपलब्ध असेल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.