UPI च्या नियमांत मोठे बदल
बॅलेंस चेक करण्याच्या लिमिटपासून ते ऑटोपर्यंतचे नियम बदलले
१ ऑगस्टपासून लागू होणार नियम
देशातील कोट्यवधी लोक यूपीआयचा वापर करतात. यूपीआयचा वापर करुन भाजी घेण्यापासून ते कोणालाही पैसे पाठवता येतात. यूपीआयमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. दरम्यान, आता यूपीआयच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. १ ऑगस्ट २०२५ पासून हे नवीन नियम लागू होणार आहे.
यूपीआयच्या नियमांत बदल झाल्याने फोनपे, गुगल पे, पेटीएम या अॅपवर परिणाम होणार आहे. यातील काही नियमातं बदल होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयचा वापर अधिक जास्त, सुरक्षित व्हावा, यासाठी हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बॅलेंस चेक करण्याची लिमिट (Balance Check Limit)
आता १ ऑगस्टपासून बॅलेंस चेक करण्याच्या लिमिटमध्ये बदल झाले आहे. आता तुम्ही दिवसाला फक्त ५० वेळाच यूपीआयवरुन बॅलेंच चेक करु शकतात. दरम्यान,सारखा बॅलेंस चेक केल्यावर सर्व्हरवर दबाव पडतो. त्यामुळे ट्रान्झॅक्शन व्हायला वेळ लागतो.
लिंक बँक अकाउंट चेक करण्याची लिमिट
अनेकांचे एका मोबाईल नंबरवरुन अनेक बँक खाती असतात. फोन नंबरशी लिंक बँक खात्यातील बॅलेंस तुम्ही फक्त २५ वेळा चेक करु शकतात.
पेमेंट स्टेट्स (Payment Status)
आता यूजर्स व्यव्हार करताना पेमेंटचा स्टेट्स दिवसातून फक्त तीनवेळा चेक करु शकतात.तीन वेळा चेक करताना मध्ये कमीत कमी ९० सेकंडचे अंतर असावे.
ऑटोपे ट्रान्झॅक्शनमध्ये बदल (UPI Autopay Transaction)
आता विविध प्लॅटफॉर्मसाठी ऑटोपे करण्याची वेळ निश्चित केली जाईल. सकाळी दहा वाजताच्या आधी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतर तुम्ही ऑटोपे करु शकतात.
पेमेंट रिवर्सलची लिमिट
चार्जबॅक म्हणजेच पेमेंट रिवर्सलची लिमिटदेखील निश्चित करण्यात आली आहे. आता तुम्ही एका महिन्यात १० वेळा आणि एका व्यक्तीकडून ५ वेळाच चार्जबॅक मागू शकतात.
यूपीआयचे नवे नियम कधीपासून लागू होणार आहेत?
१ ऑगस्ट २०२५ पासून यूपीआयचे नवीन नियम देशभरात लागू होतील.
बॅलेंस चेक करण्यावर काय मर्यादा बदलली का?
आता युजर्स दिवसाला फक्त ५० वेळा बॅलेंस चेक करू शकतील.
पेमेंट स्टेटस किती वेळा पाहता येईल?
पेमेंट स्टेटस दिवसात केवळ ३ वेळा चेक करता येईल. प्रत्येक वेळी किमान ९० सेकंदांचे अंतर असावे लागेल.
ऑटोपे ट्रान्झॅक्शनसाठी नवीन वेळा काय आहेत?
सकाळी १० वाजेच्या आधी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतरच ऑटोपे व्यवहार करता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.