RBI On UPI Limit Saam Tv
बिझनेस

UPI Limit: आरबीआयनं वाढवली UPIची लिमिट; वॉलेटमध्ये ठेवता येणार भरमसाट पैसा

RBI On UPI Limit: आरबीआयने युनिफाइड पमेंट इंटरफेसचा व्यवहार सोपा होण्यासाठी आणि सामान्य लोकांनीही याचा वापर करावा यासाठी नवीन सुविधा सुरू केलीय.

Bharat Jadhav

RBI Increases UPI Limit: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआयच्या वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आरबीआयने युपीआय लाइटच्या माध्यमातून ऑफलाइन डिजिटल पेमेंटची लिमिट वाढवण्यात आलंय. यासह युपीआय वॉलेटची मर्यादा २००० रुपयांनी वाढवून ५००० रुपयांवर करण्यात आलीय. यासह युपीआय लाइटमध्ये प्रति व्यवहाराची मर्यादेला ५०० रुपयांनी वाढवून १००० रुपये करण्यात आलीय. दरम्यान ऑफलाइ पेमेंटमधून व्यवहार करताना ऑफलाइन ट्रांजेक्शन एकूण मर्यादा २००० रुपये असणार आहे.

युपीआय लाइटच्या माध्यमातून ५००० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात. यामुळे प्रत्येक छोटे-छोट्या पेमेंटचं बँक स्टेटमेंट पाहण्याची गरज नसेल. सामान्य लोकांनीही युपीआयचा वापर करावा यासाठी आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. प्रत्येक युपीआय लाइटसाठी मर्यादा वाढवण्यात आलीय १०००रुपये प्रत्येक ट्रांजेक्शन असणार आहे. यात एकूण मर्यादा ५००० रुपये असणार आहे.

युपीआय लाइटच्या अंतर्गत होणाऱ्या व्यवहार हे ऑफलाइन असतात. यात व्हॅलिडेशनसह फॅक्टर ऑफ आयडेंटिफिकेशनची गरज राहत नाही. यासह व्यवहाराचे अलर्ट रिअल टाइमावर पाठवलं जातं आहे. ऑफलाइन पेमेंट म्हणजे यासाठी मोबाईल फोनवर इंटरनेट किंवा टेलिकॉम कनेक्टिव्हिटी आवश्यक नसते. रिझर्व्ह बँकने ऑफलाइन ट्रांजेक्शनमध्ये छोटी मर्यादेच्या डिजिटल पेमेंटच्या सुविधा करण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये ऑफलाइन स्ट्रक्चरची तरतूद केली होती. आरबीआयने या वर्षाचा ऑक्टोबर महिन्यात याची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT