UPI Bank Service Saamtv
बिझनेस

UPI Bank Service: ऐका हो ऐका! एक एप्रिलपासून बंद होईल 'या' मोबाईल नंबरवरील बँकिंग आणि UPI ची सेवा

UPI Bank Service: तुम्ही UPI द्वारे बँकिंगची काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या नियमाविषयी जाणून घ्या नाहीत डोक्याला हात लावावा लागेल.

Bharat Jadhav

UPI चा वापर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण पुढील महिन्यापासून बँक महत्त्वाचा बदल करणार आहे. एक एप्रिलपासून बँक Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या UPI ॲप्सशी कनेक्ट केलेल्या युझर्सची खाती बंद करणार आहे. दचकलात! आहो, बँक सर्वांची सेवा बंद करणार नाहीये. पण ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहेत, त्यांच्या नंबरवरील युपीआयची सेवा बंद करण्यात येणार आहे.

सेवा बंद करण्यात येणाऱ्या मोबाईल नंबर आपल्या सिस्टीममधून काढण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने बँकांना आणि या ॲप्सना निर्देश दिलेत. बँकांना आणि अॅप्सला ३१ मार्चपर्यंत नंबर काढून टाकण्याचे निर्देश दिलेत. या बदलाचे उद्दिष्ट निष्क्रिय किंवा पुनर्वापर केलेल्या मोबाईल नंबरमुळे उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. निष्क्रिय किंवा रिसायकल करण्यात आलेल्या मोबाईल नंबरमुळे व्यवहारांमध्ये समस्या निर्माण होत आहेत.

वाचक मित्रांनो, जाणून घ्या जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबरवरून ९० दिवसापर्यंत व्हाईस कॉल, एसएमएस किंवा त्यावरील डेटाचा वापर केला नाही तर तुमचा तो नंबर निष्क्रिय होत असतो. निष्क्रिय झालेले नंबर दुसऱ्या युझर्सला दिला जातो. यामुळे जेव्हा हे क्रमांक तुमच्या बँक आणि इतर वित्तीय सेवांशी जोडले जातात तेव्हा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या नंबरवरील सर्व युपीआयची सेवा बंद केली जाते.

एक एप्रिलपासून बँक अकाऊंट डिलिट करण्याचं काम केलं जाईल. कोणत्या पेमेंटसाठी मोबाईल नंबर आवश्यक असतो. जर तुमच्या मोबाईल नंबरमध्ये काही समस्या असेल तर पैशांचे व्यवहार अयशस्वी होत असतात. अनेक युझर्स आपले बँक खाते किंवा युपीआय अॅप अनेक नंबरशी लिंक करतात. त्यात जर त्यांचा मोबाईल नंबर बऱ्याच दिवसांपासून बंद राहिला तर त्याची सेवा निष्क्रिय होत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT