आधार कार्डामधला पत्ता बदलण्यासाठी आता आधार सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही. UIDAI ने सुरु केलेल्या नवीन Aadhaar App मुळे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरूनच पत्ता अपडेट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रोसेस जलद, सोपी आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये कुटुंब प्रमुखाच्या (Head of Family) मदतीनेही पत्ता अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आधार कार्डाचा पत्ता बदलण्यासाठी सर्वातआधी मोबाईलमध्ये UIDAI चे Aadhaar App डाउनलोड करा. अॅप सुरू केल्यानंतर ६ अंकी PIN वापरून लॉगिन करा. त्यानंतर Services विभागात जाऊन Address Update हा पर्याय निवडा. आता नवीन पत्ता अचूकपणे भरून त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
पत्ता अपडेट करण्यासाठी खालीलपैकी कोणताही वैध पत्त्याचा पुरावा वापरता येईल.
वीजेचे बिल
बँक पासबुक
रेशन कार्ड
किंवा UIDAI ने मान्य केलेले इतर पत्त्याचे पुरावे
कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असणं गरजेचं आहे. चुकीची किंवा अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केल्याने अर्ज नाकारला जाऊ शकतो.
अर्ज पूर्ण करण्याआधी भरलेला नवीन पत्ता नीट तपासा. इंग्रजी आणि स्थानिक भाषेतली माहिती योग्य असल्याची खात्री करा. त्यानंतर Face Authentication प्रोसेस पूर्ण करा आणि ७५ रुपये शुल्क ऑनलान भरा. अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर SRN (Service Request Number) असलेली पावची जतन करून ठेवा. याच क्रमांकाच्या मदतीने अर्जाची स्थिती (Status) ऑनलाइन तपासता येते.
ऑनलाइन पत्ता अपडेट करण्यासाठी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. सध्या Aadhaar App च्या मदतीने पत्ता आणि काही इतर सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. पण नाव, जन्मतारीख किंवा इतर मोठे बदल करण्यासाठी अद्याप आधार सेवा केंद्रालाच भेट द्यावी लागू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.