Off Roading SUV Saam Tv
बिझनेस

जबरदस्त इंजिन अन् दमदार मायलेजसह लाँच होणार या Off Roading SUV, पाहा लिस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Upcoming Off Roading SUVs In 2024:

कार खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते. कार खरेदी करताना सर्वजण कारमधील फिचर्स इंजिन बघतात. कार सर्व प्रकारच्या रस्त्यावर चालवता यायला हवी, त्यामुळे अनेकजण ऑफ रोडिंग एसयूवी घेतात. तुम्हीही जर ऑफ रोडिंग वाहन घेण्याचा विचार करत असाल तर येत्या काही दिवसांत अनेक नवीन ऑफ रोड एसयूव्ही लाँच होणार आहेत.

5-Door Mahindra Thar

थार ही कार सर्वांनाच आवडते. लवकरच थार 5-Door Mahindra Thar लाँच होणार आहे. या कारमध्ये आधुनिक फिचर्स आणि उत्कृष्ट डिझाइन देण्यात आले आहे. यात नवीन नवीन हेडलाइनर, फ्रंट आर्मरेस्ट, सनग्लासेस होल्डर आणि इलेक्ट्रिक सनरूफ यांसारखे फिचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. नवीन कारमध्ये ३ डोर महिंद्रा थारच्या तुलनेत लांब व्हीलबेससह आणि जास्त स्पेस असण्याची शक्यता आहे. या कारचे अलॉय व्हिलचे डिझाइन ३ डोर महिंद्रा थारच्या तुलनेत वेगळे असू शकते.

इंजिन

Mahindra Thar 5-doorमध्ये 2.2-लीटर डिझेल (130 PS) आणि 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल (150 PS) इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे. यात स्वयंचलित आणि ट्रान्समिशन पर्याय दिले जाऊ शकतात.

New-Gen Toyota Fortuner

टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) येत्या काही महिन्यांत जागतिक बाजारपेठेत न्यू जनरेशन फॉर्च्युनर लॉन्च करू शकते. ही कार पुढील वर्षात भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार, ही कार GD Hybrd या सौम्य हायब्रिड टर्बो डिझेल पावरट्रेनसह सुसज्ज असण्याची शक्यता आहे. ही एक क्रूझर कॉम्पॅक्ट एसयूव्ही असू शकते.

Hyundai Tucson facelift

ह्युंदाई कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात Hyundai Tucson facelift अनावरण केले आहे. या एसयूव्हीत अनेक नवीन अपडेट्स असू शकतात. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक प्रिमियम असेल. ह्युंदाईने या कारबाबत अद्याप कोणतेही माहिती दिलेली नाही. या नवीन एसयूव्हीमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच पॉवरट्रेन असण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT