Royal Enfield Upcoming Bike Saam Tv
बिझनेस

Upcoming Bike: लवकरच संपणार प्रतीक्षा! येत आहेत रॉयल एनफिल्डच्या 5 नवीन बाईक्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Royal Enfield Upcoming Bike:

जर तुम्ही नवीन रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Royal Enfield पुढील काही महिन्यांत अनेक नवीन जबरदस्त बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच 350cc, 450cc आणि 650cc सिरीजचा विस्तार करणारी आहे.

ग्राहक कंपनीच्या आगामी रेट्रो-थीम असलेली बाईकची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये Classic 650, Bobber 350 आणि Scrambler सीरीज समाविष्ट आहेत. कंपनीच्या आगामी बाईकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Royal Enfield Classic 650

क्लासिक 350 च्या यशानंतर रॉयल एनफील्ड या वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत क्लासिक 650 लॉन्च करू शकते. आगामी बाईकमध्ये ग्राहकांना क्रोम-रिम्ड गोल हेडलाइट, सिग्नेचर पायलट लॅम्प फीचर्स, टेल-लॅम्प पॉड आणि 648cc ट्विन-सिलेंडर इंजिन मिळू शकते. (Latest Marathi News)

Royal Enfield Classic-350-based Bobber

रॉयल एनफील्ड लवकरच 350cc बॉबर बाईक लॉन्च करू शकते. Royal Enfield ची आगामी बाईक 350cc J-प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. असलं असलं तरी अद्याप या बाईकच्या लॉन्चिंगची अधिकृत तारीख समोर आलेली नाही.

Royal Enfield Scram 450

Royal Enfield Scram 450 बाईक लवकरच बाजारात लॉन्च केली जाऊ शकते. रॉयल एनफिल्डच्या आगामी बाईकमध्ये एक गोल हेडलाइट, एक रुंद हँडलबार आणि कॅन्टीलिव्हर पिलियन सीट मिळेल. आगामी बाईकमध्ये ग्राहकांना सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड 450cc इंजिन मिळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT