Union budget 2025 Saam tv
बिझनेस

Union budget 2025: अर्थसंकल्पात दारूच्या दरात वाढ नाही, तरी महाग होणार? जाणून घ्या कारण

Union budget 2025 update : अर्थसंकल्पात दारूच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र, तरीही दारु महाग होणार अशी अंदाज वर्तवण्यात येत आहे. दारूचे दर वाढल्यास तळरामांच्या खिशांना कात्री बसण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात आतापर्यंत विविध घोषणा केल्या. सीतारामन यांनी नोकरदारांची १२ लाखापर्यंतची कमाई करमुक्त केली आहे. सीतारामन यांच्या घोषणेचा फायदा तब्बल २०-३० कोटी लोकांना होणार आहे. या अर्थसंकल्पात दारू आणि बीअरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, तरीही बीअर आणि दारु पिणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.

सरकारने अनेक वस्तूंवरील एक्साईज आणि कस्टम ड्यूटीत वाढ केली आहे. यामुळे तंबाखू, दारू आमि बीअर सारख्या उत्पादकांच्या दरात वाढ होऊ शकते. अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रातील आयात शुल्क वाढवले आहे. उत्पन्न कर वाढवल्यामुळे काही वस्तूच्या दरात वाढ होणार आहे. साधारणपणे अर्थसंकल्पात कोणत्याही क्षेत्रातील कर वाढवला किंवा कमी केला जातो.

यामुळे बीअर आणि दारुवरील आयात शुल्क कमी करण्याऐवजी वाढवलं आहे. त्यामुळे भारतीय ब्रँडचे बीयर आणि दारूच्या दरात फारसे अंतर पाहायला मिळणार नाही. मात्र, परदेशी ब्रँडचे बीयर आणि दारुच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे परदेशी दारु पिण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागेल.

Sin Tax म्हणजे काय?

तंबाखू उत्पादकांवर मोठा परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सिगारेट किंवा ई-सिगारेटच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते. परंतु सरकारने sin taxमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे बीअर आणि दारूच्या दरात फार वाढ होणार नाही. सरकार लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या उत्पादकांवर Sin कर लावला जातो.

सरकारकडून दर वाढवून विक्रीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थसंकल्पाआधी फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरेंट एसोशिएशन ऑफ इंडियाने सरकारला विनंती केली होती की, दारू आणि उत्पादन शुल्काच्या लायसन्सचे नियम सुरळीत करावे. मात्र, अद्याप काही राज्याचे अर्थसंकल्प सादर करणे बाकी आहे. त्यामुळे त्यानंतरच दारू आणि बीअरचे दर किती वाढणार, हे कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT