Nirmala sitharaman Speech Budget 2025  saam tv
बिझनेस

Nirmala Sitharaman Speech : मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; ७ कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा

KCC limit increased : केंद्रातील मोदी सरकारनं देशातील शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याची घोषणा आज निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना केली.

Nandkumar Joshi

देशातील गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांना समर्पित अर्थसंकल्प मांडताना केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना, शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना जाहीर करायला सुरुवात केली. बळीराजाला बळ देणारी घोषणाही यावेळी त्यांनी केली. किसान क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी घोषित केलं. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून ती पाच लाख रुपये करण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील सात कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांना आता अगदी सहजगत्या कर्ज मिळू शकणार आहे.

७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

सध्याच्या घडीला ७.७ कोटी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. शेती करणारे शेतकरी, मच्छिमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना या क्रेडिट कार्डचा लाभ मिळतो. सरकारने आता या क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाखांपर्यंत केली आहे. यापूर्वी या कार्डची मर्यादा तीन लाखांपर्यंत होती. त्यामुळे स्वस्त दराने शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड?

सरकारकडून शेतकऱ्यांना शॉर्ट टर्म अॅग्री लोन दिला जातो. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. तर सरकारकडून शेतकऱ्यांना दोन टक्क्यांचे अनुदान दिले जाते. वेळेवर कर्ज फेडलात तर व्याजात ३ टक्क्यांची आणखी कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजदराने किसान क्रेडिट कार्डवर पैसे मिळतात. या योजनेची सुरुवात सन १९९८ मध्ये झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT