Uniform KYC Saam Digital
बिझनेस

Uniform KYC Meaning: युनिफॉर्म केवायसी म्हणजे काय? बँक खात्यापासून ते शेअर बाजारापर्यंत सर्वच क्षेत्रात कसा होईल उपयोग? जाणून घ्या

Uniform KYC Meaning in Marathi: 'युनिफॉर्म केवायसी' किंवा 'सिंगल केवायसी' प्रणाली लागू करण्याची सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे बँक खाते उघडण्यापासून ते विमा खरेदी, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी याचा फायदा होणार आहे.

Sandeep Gawade

Know About Uniform KYC

आधार कार्ड जेव्हापासून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे, तेव्हापासून मोबाईल फोन नंबर मिळण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत सर्व काही सोपं झालं आहे. असे असूनही, एक समस्या अजूनही कायम आहे की प्रत्येक कामासाठी तुम्हाला तुमची ओळख स्वतंत्रपणे सिद्ध करावी लागेल म्हणजेच केवायसी मानदंड पूर्ण करावे लागतील. कल्पना करा, KYC सबमिट करण्याचा हा वारंवार होणारा त्रास संपला तर काय होईल?

आता लवकरच तुम्हाला देशात फक्त एकदाच तुमची ओळख सिद्ध करावी लागण्याची शक्यता आहे. सरकारने तुमचा डेटा मध्यवर्ती ठिकाणी सेव्ह केला तर तुमचे एकच KYC बँक खाते उघडण्यापासून ते विमा खरेदी, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. यासाठी 'युनिफॉर्म केवायसी' किंवा 'सिंगल केवायसी' प्रणाली लागू करण्याची सरकारमध्ये चर्चा सुरू आहे.

युनिफॉर्म केवायसी म्हणजे काय?

संपूर्ण आर्थिक क्षेत्रातील विविध संस्थांद्वारे एकच KYC वारंवार वापरता येईल, याबाबत फाइनेंशियल स्टेबिलिटी एंड डेवलपमेंट काउंसिलने (FSDC) काही वर्षांपूर्वी अशा पद्धतीची KYC प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. जेणेकरून सामान्य लोकांसाठी सोपे होईल आणि केवायसी प्रक्रियेचा खर्चही कमी होईल. यावर अर्थ मंत्रालयाने वित्त सचिव टी.व्ही.सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी FSDC च्या बैठकीत एकच KYC लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. या अंतर्गत केवायसी प्रक्रियेचे जास्तीत जास्त डिजिटलायझेशन केले जाऊ शकते. केवायसी रेकॉर्डची इंटर-यूजेबिलिटी सुनिश्चित करता येईल अशी प्रणाली विकसीत करवी लागणार आहे, ET ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

युनिफॉर्म केवायसी कसं काम करेल?

आता प्रश्न अशा आहे की यूनिफार्म किंवा सिंगल केवाईसी सिस्टम कशी कार्य करेल? युनिफॉर्म केवायसीसाठी आधीच काही विभागांमध्ये कार्यरत आहे. तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास, तुमचे KYC थेट रजिस्टर्ड ब्रोकर्सद्वारे मार्केट रेग्युलेटर सेबी पूर्ण केले जाते. अशा स्थितीत तुम्ही पुन्हा पुन्हा नवीन गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची केवायसी करण्याची गरज नाही. या केवायसीच्या आधारे तुम्ही म्युच्युअल फंड आणि इतर डेरिव्हेटिव्हमध्येही गुंतवणूक करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT