Toyota Vellfire Car Saam Tv
बिझनेस

Toyota Car: नाव मोठे, विक्रीत तोटे! फेब्रुवारीमध्ये फक्त 57 लोकांनी खरेदी केली ही लक्झरी कार

Toyota Vellfire Car: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहे. या महिन्यात कंपनीची लोकप्रिय कार इनोव्हाची सर्वाधिक विक्री झाली.

Satish Kengar

Toyota Vellfire Hybrid Car:

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने फेब्रुवारी 2024 मध्ये आपल्या विक्रीचे आकडे प्रसिद्ध केले आहे. या महिन्यात कंपनीची लोकप्रिय कार इनोव्हाची सर्वाधिक विक्री झाली. तर कंपनीच्या सर्वात महागड्या वेलफायरची विक्री केवळ 57 युनिट्स होती. गेल्या काही महिन्यांपासून वेलफायरची विक्री खूपच कमी झाली आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या कारची विक्री 0 आणि 3 वर आली होती. वेलफायरची प्रारंभिक किंमत 1.20 कोटी रुपये आहे. टोयोटाच्या एकूण विक्रीत वेलफायरचा बाजारातील वाटा फक्त 0.24 टक्के आहे. सहा महिन्यात या कारची किती झाली विक्री? हे जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Toyota Vellfire ची महिला 6 महिन्यात इतकी झाली विक्री

  • सप्टेंबर 2023 - 0

  • ऑक्टोबर 2023 - 3

  • नोव्हेंबर 2023 - 53

  • डिसेंबर 2023 - 37

  • जानेवारी 2024 - 61

  • फेब्रुवारी 2024 - 57

टोयोटा वेलफायरचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Toyota Vellfire Strong Hybrid मॉडेलमध्ये 2.5-लिटर इनलाइन फोर-सिलेंडर DOHC इंजिन मिळते. जे 142 kW चे पॉवर आणि 240 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन इलेक्ट्रिक मोटर आणि हायब्रिड बॅटरीसह येते. (Latest Marathi News)

कारच्या आतमध्ये एक खूप लांब ओव्हरहेड कन्सोल आहे. जो छताच्या मध्यभागी बसवला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी यात अनेक कंट्रोल देण्यात आली आहेत. यात 15 जेबीएल स्पीकर, ॲपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटीसह 14 इंची इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत.

ही कार रिमोट डोर लॉक/अनलॉक, एअर कंडिशनिंग, ड्रायव्हर मॉनिटरिंग अलर्ट यासारख्या 60 हून अधिक कनेक्ट फीचर्ससह येते. टोयोटाचे हे मॉडेल Advanced Driver Assistant System (ADAS) सारख्या सेफ्टी फीचर्ससह येते. यात क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्टन्स, हाय बीम एलईडी हेडलॅम्प आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर सारखेही फीचर्स देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT