Rules Changed From 1 August 2026: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये बदल होत असतात. १ ऑगस्ट २०२६ पासून सर्वसामान्य नागरिकांवर थेट परिणाम करणारे पाच मोठे बदल लागू झाले आहेत. यामध्ये व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किंमतीत कपात, रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली, उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी सक्ती, KYC 2.0 प्रणाली आणि क्रेडिट कार्ड बिलिंग नियमांमध्ये बदल यांचा समावेश आहे.
तेल कंपन्यांनी १ ऑगस्टपासून व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर कमी केले आहेत. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलेंडरची किंमत १९२ रुपयांनी, कोलकातामध्ये २०९ रुपयांनी , मुंबईमध्ये १९४ रुपयांनी आणि चेन्नईमध्ये २०० रुपयांनी किंमत कमी झाली आहे.पण घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवीन टोकन प्रणाली लागू केली आहे. याआधी वेगवेगळ्या काउंटरवर लांबच्या लांब रांगा लागायच्या. आता प्रवाशांना सर्वात आधी टोकन दिले जाईल आणि क्रमांकानुसार तिकीट दिले जाईल. त्यामुळे गर्दी कमी आणि वेळेचीही बचत होईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतगर्तत LPG सबसिडी मिळवणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण केली नाही की, सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
आजपासून बँकिंग, विमा आणि म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये KYC 2.0 प्रणाली सुरू झाली आहे. या नव्या प्रणालीमुळे सर्व वित्तीय संस्था केंद्रीय डेटाबेसमधून ग्राहकांची पडताळलेली माहिती वापरतील. त्यामुळे सतत KYC करण्याची गरज कमी होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड बिलिंग नियमांमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांनी बिलाची संपूर्ण रक्कम वेळेवर भरली नाही, तरी शिल्लक रकमेवर काही दंडात्मक शुल्क आणि कर आकारणीबद्दल दिलासा मिळणार आहे. त्यामुळे व्याजाचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.
याशिवाय ५ ऑगस्ट २०२६ रोजी रिझर्व्ह बँकेची पतधोरण बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजदरांबद्दल निर्णय घेतला जाणार असून, दरवाढ झाल्यावर भविष्यात मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.