Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाळी; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Today Gold Rate Hike: आज सोन्याचे दर वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले होते. त्यानंतर आज पुन्हा सोन्याने उच्चांक गाठला आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात दोन दिवसांपासून कपात झाली होती. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ४४० रुपयांनी वाढ झाली होती. आज १ तोळा सोन्याचे दर १,१४,८८० रुपये झाले आहेत. सोन्याच्या दरात आजही कपात होईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, आज हे दर वाढले आहे.

मागील अनेक महिन्यांपासून सोन्याचे उच्चांक गाठला आहे. आज तर सोन्याचे दर १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त आहेत. दरम्यान, यावर जीएसटी लावल्यामुळे हे दर अजून वाढतील. त्यामुळे सर्वसामान्यांना अजूनच फटका बसेल. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न महिलांना पडलेला आहे.

आज सोन्याचे दर वाढले

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४४० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१४,८८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९१,९०४ रुपये आहेत. या दरात ३५२ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्याचे दर ११,४८,८०० रुपये आहेत या दरात ४,४०० रुपयांची वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,०५,३०० रुपये झाले आहे.८ ग्रॅम सोन्याच्या दरात ३२० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८४,२४० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याच्या दरात ४००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर १०,५३,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ८६,१६० रुपये झाले आहेत. आज ८ ग्रॅम सोन्याचे दर ६८,९२८ रुपये झाले आहेत. या दरात २६४ रुपयांनी वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ३,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर सध्या ८,६१,६०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT