Car Loan Tips Saam Tv
बिझनेस

Car Loan Tips: सणांच्या हंगामात कार खरेदी करायची आहे? कोणती बँक स्वस्त दराने देते कर्ज?

Car Loan : बहुतेकजण सणांच्या दिवशी कार घेत असतात. तर तुमचाही तसाच विचार आहे का?

Bharat Jadhav

Car Buying Tips:

सणांच्या हंगामात कार खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बहुतेकजण सणांच्या दिवशी नवी कार विकत घेत असतात. तर तुमचाही तसाच विचार आहे का? असेल तर कोणती बँक कमी व्याजदराने कर्ज देते याची माहिती असणं आवश्यक आहे. कर्जाचे टर्म आणि अटी काय आहेत. कर्जाची मंजुरी देण्यास बँक किती शुल्क आकारत असतात, याची माहिती असणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही कमी व्याजदारने कर्ज देणाऱ्या बँकेतून कर्जाचा अर्ज करू शकतात. कोणती बँक कमी व्याजदरात कर्ज देते हे जाणून घेऊ.(Latest News)

बँकिंग तज्ज्ञांनुसार, जर तुम्ही कार कर्ज घेत असाल तर बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबत व्याजदर आणि प्रोसेसिंग फी विषयी चर्चा करावी. जर तुमचे बँकिग क्रेडिट चांगले असेल तर बँक कमी व्याजदरात कर्ज देत असतात.

कर्जाच्या रकमेवर आधारित बँकेचे EMI

कर्नाटक बँक : व्याज दर ९.२७-११.७० टक्के , EMI १०,४४५ ते ११०४७. कर्ज प्रोसेसिंग फी - ०.६० टक्के (ती हजार ते ११ हजार रुपये)

फेडरल बँक : व्याजदर- ८.८५ टक्के, ईएमआय १०,३४३, प्रोसेसिंग फी २ हजार ते ४,५०० रुपये.

पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक : व्याजदर ८.८५ ते १०.२५ टक्के, ईएमआय १०,३४३ ते १०,६८५, प्रोसेसिंग फी ०.२५ टक्के( १,००० ते १५,०००)

साऊथ इंडियन बँक: व्याजदर ८.७५ टक्के, ईएमआय १०,३१९, प्रोसेसिंग फी - १ टक्के (१० हजार रुपये)

आयडीएफसी फर्स्ट बँक : व्याजदर ९.०० ते १३.५० टक्के, ईएमआय १०,३७९ ते ११,५०५, प्रोसेसिंग फी ३.५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक.

सिटी युनियन बँक: व्याजदर १४.२५-१४.७५ टक्के, ईएमआय ११,६९९ ते ११,८२९, प्रोसेसिंग फी १.२५ टक्के (१ हजार)

युनियन बँक ऑफ इंडिया: व्याजदर ८.७५ ते १०.५० टक्के, ईएमआय १०,३१९- १०,७४७, प्रोसेसिंग फी १ हजार रुपये.

पंजाब नॅशनल बँक: व्याजदर ८.७५ - ९.६० टक्के , ईएमआय १०,३१९ ते १०,५२५ , प्रोसेसिंग फी ०.२५ टक्के (१ हजार ते १,५००).

बँक ऑफ बडोदा: व्याजदर ८.७०-१२.१० टक्के , ईएमआय १०,३०७- ११,१४८, प्रोसेसिंग फी ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक.

कॅनरा बँक: व्याजदर ८.८० टक्के ११.९५ , ईएमआय १०,३३१-११,११०, प्रोसेसिंग फी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कोणताची फी नाही.

बँक ऑफ इंडिया: व्याजदर ८.४५ ते १०.७५ टक्के, ईएमआय १०,३४३ - १०,८०९, प्रोसेसिंग फी ०.२५ टक्के(१ हजार ते ५ हजार रुपये).

युसीओ बँक: व्याजदर ८.४५ ते १०.५५ टक्के, ईएमआय १०,२४६ ते १०,७५९, प्रोसेसिंग फी नाही

स्टेट बँक ऑफ इंडिया: व्याजदर ८.६५ ते ९.७५ टक्के, ईएमआय १०,२९४ ते १०,३६२ प्रोसेसिंग फी नाही.

आयडीबीआय बँक : व्याजदर ८.७५ ते ९.५५, टक्के, ईएमआय १०,३१९ ते १०,५१३ प्रोसेसिंग फी २,५०० हजार.

बँक ऑफ महाराष्ट्र: व्याजदर ८.७० ते १३.०० टक्के, ईएमआय १०,३०७ ते ११,३७७, प्रोसेसिंग फी - नाही.

इंडियन ओव्हरसीस बँक : व्याजदर ८.८५ टक्के, ईएमआय १०,३४३ , प्रोसेसिंग फी ९९९ ते ८,५०० रुपये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT