what is whatsapp view once feature and how it works saam tv
बिझनेस

WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी मोठी बातमी! आता मेसेज फक्त एकदाच पाहता येणार; जाणून घ्या कसं वापरायचं

what is whatsapp view once feature and how it works: व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फिचरमुळे फोटो आणि व्हिडिओ फक्त एकदाच पाहता येणार आहे. प्रायव्हसी वाढवण्यासाठी आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त आहे.

Saam TV News

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीच्या दृष्टीने एक महत्त्वाचे फीचर आणत आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो, व्हिडिओ आणि व्हॉइस मेसेजसाठी उपलब्ध असलेले 'View Once' फीचर आता टेक्स्ट मेसेजसाठीही वापरता येणार आहे. त्यामुळे पाठवलेला मेसेज समोरची व्यक्ती केवळ एकदाच वाचू शकेल. त्यानंतर तो मेसेज आपोआप गायब होईल.

सध्या हे नवीन फीचर Android च्या निवडक बीटा युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या Android बीटा व्हर्जन 2.26.45.6 मध्ये या फीचरचे रोलआउट सुरू झाले आहे. मात्र, अद्याप सर्व बीटा युजर्सना ही सुविधा मिळालेली नाही. येत्या काही आठवड्यांत टप्प्याटप्प्याने अधिक युजर्सपर्यंत हे फीचर पोहोचण्याची शक्यता आहे.

कसे पाठवता येणार View Once टेक्स्ट मेसेज?

हे फीचर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम संबंधित व्यक्तीची चॅट उघडा. त्यानंतर नेहमीप्रमाणे मेसेज टाइप करा. मेसेज लिहून झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या Send बटणावर काही वेळ दाबून ठेवा. यावेळी स्क्रीनवर एक मेन्यू दिसेल. त्यामध्ये 'View Once' हा पर्याय निवडून तुम्ही मेसेज पाठवू शकता.

मेसेज वाचल्यानंतर होणार गायब

View Once पद्धतीने पाठवलेला टेक्स्ट मेसेज समोरच्या व्यक्तीला सामान्य चॅटमध्ये थेट दिसणार नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीला मेसेजवर टॅप करावे लागेल. त्यानंतर तो मेसेज स्वतंत्र स्क्रीनवर उघडेल. एकदा मेसेज वाचून ती स्क्रीन बंद केल्यानंतर पुन्हा तो मेसेज उघडता येणार नाही.

मेसेज उघडला गेल्यानंतर चॅटमध्ये त्याबाबत एक संकेत दिसेल. तसेच, Read Receipts सुरू असल्यास मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीलाही समोरच्याने मेसेज वाचल्याचे समजू शकेल. त्यानंतर हा मेसेज दोन्ही बाजूंच्या चॅटमधून गायब होईल.

ना स्क्रीनशॉट घेता येणार, ना मेसेज कॉपी करता येणार

या फीचरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रायव्हसी. View Once टेक्स्ट मेसेज वाचताना स्क्रीनशॉट आणि स्क्रीन रेकॉर्डिंग घेण्यावर WhatsApp कडून बंदी असेल. याशिवाय संबंधित मेसेज कॉपी करणे, सेव्ह करणे किंवा दुसऱ्या चॅटमध्ये फॉरवर्ड करणे शक्य होणार नाही. तात्पुरता पासवर्ड, OTP किंवा संवेदनशील वैयक्तिक माहिती पाठवण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे खासगी माहिती चॅटमध्ये कायमस्वरूपी राहण्याची चिंता कमी होऊ शकते.

iPhone युजर्सना कधी मिळणार फीचर?

सध्या हे फीचर केवळ निवडक Android बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. सर्व Android युजर्ससाठी ते कधी आणले जाणार, याबाबत WhatsApp कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच iPhone युजर्ससाठी या फीचरच्या उपलब्धतेबाबत किंवा लॉन्चच्या तारखेबाबतही अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; १४३ किलो डोडा पावडरसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

Shirdi Sai Baba : साईचरणी 94 लाखांचं घड्याळ! 18 कॅरेट सोनं, शुद्ध चांदी

विधानसभा निवडणुकीआधीच 8 आमदारांचं तिकीट कापलं; दुसरी यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Mhauli Ghat Road: माऊली घाटातून पंढरीचा मार्ग सुकर! ३१ वर्षांची प्रतीक्षा संपणार, वारकऱ्यांसाठी नवा रस्ता होणार तयार

SCROLL FOR NEXT