"Upcoming Realme 16 Pro+ and Redmi Note 16 Pro+ to debut in India with stunning 200MP camera features." saam tv
बिझनेस

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

Realme 16 Pro+ आणि Redmi Note 16 Pro+ लवकरच भारतात 200MP कॅमेरे आणि प्रीमियम फीचर्ससह लाँन्च होणार आहेत. नव्या स्मार्टफोन्समध्ये काय फीचर्स असतील याची माहिती लीक झालीय.

Bharat Jadhav

  • दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लीक झालेत.

  • Realme 16 Pro+ भारतात तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

  • भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये या दोन्ही मॉडेल्समुळे मोठी स्पर्धा वाढणार

Realme आणि Redmi कंपनी शानदार फोन लॉन्च करणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन 200MP कॅमेऱ्यांसह लाँच केले जातील. दोन्ही स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल माहिती लीक झालीय. Realme आणि Redmi कंपनी लवकरच त्यांचे प्रो प्लस स्मार्टफोन लाँच करण्याची तयारीत आहेत. Realme 16 Pro+ आणि Redmi Note 16 Pro+ हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच प्रभावी फिचर्ससह लाँच केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दोन्ही मॉडेल्समध्ये मागील बाजूस 200-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असेन. Realme 14 Pro+ नंतर हे कंपनीचे पहिले Pro+ मॉडेल असेल. हा फोन भारतात तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँन्च होईल.

Redmi Note 16 Pro+ चे फीचर्स

मध्यम रेंजच्या रेडमी फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशनची माहिती लीक झाली आहे. या फोनमध्ये 200 -मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा सेन्सर असू शकतो. दरम्यान रेडमी नोट 15 प्रो प्लसचे अपग्रेड असलेले नोट 16 प्रो प्लस डिसेंबरच्या अखेरीस भारतात लाँन्च होण्याची अपेक्षा आहे. नोट 15 प्रो प्लस यावर्षी ऑगस्टमध्ये चीनमध्ये लाँन्च झाला.

भारतात लॉन्च होणाऱ्या फोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5K डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि 3200 निट्सचा पीक ब्राइटनेस असण्याची अपेक्षा आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s जनरल 4 प्रोसेसर, 16GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512GB पर्यंत UFS2.2 अंतर्गत स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे.

Realme 16 Pro+ चे फीचर्स

Realme देखील मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक नवीन फोन लाँन्च करत आहे. Realme 16 Pro+ मध्ये 200-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असू शकतो. Realme फोन लवकरच भारतात 8GB/128GB, 8GB/256GB, 12GB/256GB आणि 12GB/512GB या 4 रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये लाँन्च केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

SCROLL FOR NEXT