Tax Saving Tips Google
बिझनेस

Tax Saving Tips: टॅक्स जास्त कापला गेलाय; अशी करा बचत, कुठे-कुठे कराल गुंतवणूक? वाचा

Tax Saving Tips For Employees: प्रत्येक कर्मचाऱ्यांना टॅक्स हा भरावा लागतो. तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक करुन टॅक्स वाचवू शकतात. कसं ते जाणून घ्या.

Siddhi Hande

प्रत्येत कर्मचाऱ्याला टॅक्स हा भरावा लागतो. ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न ७ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना कर भरावा लागतो. परंतु तुम्ही अनेक मार्गांनी कर कमी करु शकतात. तुमच्या उत्पन्नावर असणारा कर तुम्हाला कमी करता येऊ शकतो. कलम 80C अंतर्गत तुम्ही अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. यामुळे तुमच्या पैशांची बचत होते.तुमच्या कशा प्रकारे कर वाचवू शकतात,याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

इक्विटी आणि बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा (Equity and Saving Scheme)

तु्म्ही सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन कर वाचवू शकतात. म्युच्युअल फंड्समध्येही गुंतवणूक करुन तुम्ही बचत करु शकतात. यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात.

कर्मचारी निर्वाह निधी (Employee Provident Fund)

कर्मचारी निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमच्या पैशांची बचत होणार आहे. ईपीएफमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकतात. कर भरावा लागला तरीही ही गुंतवणूक सुरक्षित असते. तुम्हाला यामध्ये सेवानिवृत्तीनंतर पैसे मिळतात.

पीपीएफ (Public Provident Fund)

पीपीएफमध्येदेखील तुमचा कर कलम 80C अंतर्गत भरावा लागतो. त्यामुळे तुम्हाला कमी कर भरावा लागणार आहे. परंतु पीपीएफवर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुमच्या गुंतवणूकीवर ७.१ टक्के व्याजदर दिले जाते. १५ वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करु शकतात. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होणार आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate)

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेवर तुम्हाला कलम 80C अंतर्गत टॅक्सवर सूट मिळणार आहे.. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कोणत्याही रिस्कशिवाय चांगला परतावा मिळतो.

आयुर्विमा (Life Insurance)

आयुर्विमामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. फक्त तुम्ही जर प्रिमियम पॉलिसी घेतली तरच तुम्हाला कलम 80C अंतर्गत टॅक्स भरावा लागतो.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्समध्ये चांगली सूट मिळते. या योजनेत तु्म्हाला चांगला परतावा मिळतो. ही योजना खास मुलींसाठी आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला या योजनेतील पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT