Tata Tiago EV Offer Saam Tv
बिझनेस

Tata Tiago EV वर मिळत आहे 85,000 रुपयांची मोठी सूट, कमी किंमतीत कार खरेदी करण्याची संधी

Tata Tiago EV Offer: जर तुम्ही एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते.

साम टिव्ही ब्युरो

Tata Tiago EV Offer:

जर तुम्ही एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. कंपनी या महिन्यात आपल्या ग्राहकांना कारवर चांगली सूट देत आहे. या महिन्यात टाटा टियागो इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही 85 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.

ही सूट कंपनी आपल्या लिमिटेड स्टोकवर देत आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही टाटा मोटर्स डीलरशीपशी संपर्क साधू शकता. Tiago ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मिनी कारपैकी एक इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स-शो रूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

फीचर्स आणि रेंज

Tiago EV मध्ये 19.2kWh आणि 24kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. सिंगल चार्जिंगमध्ये याची ड्रायव्हिंग रेंज 250 किलोमीटर ते 315 किलोमीटर आहे, असा दावा कंपनीने केला आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये 2 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

या कारला क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार NCAP रेटिंग मिळाली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tiago EV मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते आणि यात 4-स्पीकर देखील ग्राहकांना मिळणार.

Tata Punch EV वरही मिळत आहे मोठी सूट

तुम्ही या महिन्यात Tata Punch EV खरेदी केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांची सूट मिळेल. ही सूट फक्त याच्या टॉप-स्पेक पंच EV Empowered + S LR AC फास्ट चार्जरवर उपलब्ध आहे. याची किंमत 10.98 लाख ते 15.49 लाख रुपये आहे. म्हणजेच या महिन्यात तुम्ही ही कार खरेदी केल्यास तुम्हाला या सवलतीचा लाभ घेता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT