MG Motors ने भारतात त्यांची लोकप्रिय SUV Hector चा BLACKSTORM एडिशन लॉन्च केला आहे. याची किंमत 13.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या नवीन एडिशनमध्ये तुम्हाला अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये हेक्टर एक जबरदस्त कार आहे. यात अशी अनेक फीचर्स आहेत जी इतर कोणत्याही SUV मध्ये दिसत नाहीत.
नवीन एडिशनमध्ये 14-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टिम ग्राहकांना मिळणार आहे. एवढी मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम अजून कोणत्याही SUV मध्ये उपलब्ध नाही. हेक्टरच्या या नवीन व्हेरियंटमध्ये तुम्हाला काय नवीन आणि विशेष पाहायला मिळेल ते जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
MG Hector BLACKSTORM दोन इंजिन पर्यायांसह येते. यात 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 143PS पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन CVT गियर बॉक्ससह येते. (Latest Marathi News)
या व्यतिरिक्त या कारमध्ये 1.5L टर्बो डिझेल इंजिन आहे, जे 170 पीएस पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6MT गियर बॉक्ससह येते. हेक्टर ब्लॅकस्टॉर्म एडिशनची किंमत 21,24,800 ते 22,75,800 रुपये आहे.
MG Hector BLACKSTORM मध्ये तुम्हाला 5,6 आणि 7 सीटरचा पर्याय मिळतो. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडू शकता. याची स्पर्धा Tata Harrier, Mahindra XUV700, Hyundai Tucson, Volkswagen Tiguan आणि Citroen C5 Aircross यांच्याशी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.