Tata Punch 
बिझनेस

Tata Punch: फक्त 1 लाखात घरी आणा टाटाची दमदार कार; लोनवर किती भरावे लागेल EMI

How to Buy Tata Punch CNG on EMI: : टाटा पंच कारमध्ये ७ इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम ऑटोमेटिक एअर कंडिशन आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारखे फीचर्स मिळतात.

Bharat Jadhav

जर तुम्ही ईएमआयवर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील कार निर्माती कंपनी दमदार कार तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये देत असून तुमचं गाडीचं स्वप्न करणार आहे. चांगले मायलेजवाली कार घ्यायची असेल तर टाटा कंपनीची टाटा पंच सीएनजीचं बेस व्हेरिएंट भारी आहे. या लेखात आपण कारची किंमत आणि ईएमआय किती जाईल याची माहिती घेऊ.

भारतीय बाजारात टाटा पंचच्या एक्स-शोरूम किंमत 7 लाख 23 हजार रुपयांना उपलब्ध आहे. दिल्लीमध्ये या कारची पुअर सीएनजी व्हिरिएंटवर 50 हजार 603 रुपयांच्या आरटीओ शुल्क आणि 39 हजार 359 रुपयांचा विमा लागतो. याप्रकारे ही कार ऑन रोड 8 लाख 12 हजार 862 रुपयाला मिळत असते.

किती द्यावी लागेल डाऊन पेमेंट

टाटा पंचचं बेस व्हेरिएंट खरेदी करण्यास तुम्हाला १ लाख रुपये डाऊनपेमेंट करावे लागेल. यासह 7 लाख 12 हजार 862 रुपयांचं कार घ्यावे लागेल. यात 10 टक्के व्याजदराने तुम्हाला 15 हजार 146 रुपयांचं एकूण 60 ईएमओ भरावे लागेल. हे तुम्हाला पाच वर्षांसाठी भरावे लागेल. यात तुम्हाला1 लाख 95 हजार 911 रुपयांचे व्याजदर द्यावे लागतील.

Tata Punch CNG मध्ये काय आहेत फीचर्स

टाटा पंचमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे, जे 6000 RPM वर 86 PS ची पॉवर आणि 3300 RPM वर 113 Nm टॉर्क जनरेट करते. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मानक म्हणून उपलब्ध आहे. टाटा पंच मॅन्युअल ट्रान्समिशनसह 18.97 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 18.82 kmpl मायलेज देते.

टाटा पंचमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी असेल. ही कार तिची मजबूत बॉडी, उत्तम डिझाइन आणि उत्कृष्ट फीचर्ससाठी ओळखली जाते. या कारमध्ये पुरेशी जागा उच्च-मानक सुरक्षा वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट मायलेज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरे यांच्या जागी मी असतो तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले,VIDEO

Ranveer Singh: रणवीर सिंह निभावतोय डॅडी ड्युटीज; आनंद व्यक्त करताना अभिनेत्याला शब्द सुचेना

SCROLL FOR NEXT