Tata Motors google
बिझनेस

Auto: मारुती सुझुकीनंतर टाटाची गाडी महागणार, १ एप्रिलपासून वाढणार किंमती

Tata Motors Increased Commercial Vehicle Prices: टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. १ एप्रिलपासून या किंमती लागू होणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताची सर्वात मोठी कमर्शियल वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने १ एप्रिलसापून आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ऑटोमोबाईल उद्योगातील कच्च्या मालाच्या किमती सतत वाढत आहेत. ज्यामुळे कंपनीच्या खर्चावर याचा परिणाम होत आहे. वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे कंपनीने म्हटले आहे.

टाटा मोटर्स त्यांच्या कमर्शियल गाड्यांच्या म्हणजेच ट्रकच्या किमतीत २ टक्क्यांपर्यत पर्यंत वाढ करणार आहे. वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार यांच्या किमतीत वाढ आणि बदल होणार आहे. यापूर्वी, मारुतीन सुझुकीनेही एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत ४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

टाटा मोटर्सने वाहनांची किंमत वाढवली

टाटा मोटर्सने त्यांच्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, १ एप्रिल २०२५ पासून त्यांच्या कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक वाहनांच्या किमतीत २ टक्क्यांपर्यंत पर्यंत वाढ होईल. वाढत्या इनपुट खर्चाचे संतुलन करण्यासाठी ही किंमत वाढवली जात आहे. आणि ही किंमत प्रत्येक वाहनाच्या मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते. ऑटोमोबाईल उद्योगातील कच्च्या मालाच्या किमतीत सतत वाढ होत आहेत. आणि याचा परिणाम कंपनीच्या बजेटवर होत आहे. वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला. असे कंपनीने म्हटले आहे.

मारुती सुझुकीनेही वाढवली वाहनांची किंमत

टाटा मोटर्स आधी भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही एप्रिल २०२५ पासून आपल्या सर्व वाहनांच्या किमतीत ४ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यामागे अनेक कारणे असल्याचं सांगितले आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढता वाहतूक खर्च आणि वाढती महागाई या सर्व कारणांमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

सतत कच्चा मालाच्या किमतीत होणारी वाढ आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीतील चढ-उतार या सर्व गोष्टींमुळे मारुती सुझुकीने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की, ग्राहकांवर कमीत कमी भार टाकण्याचा प्रयत्न असेल. परंतु वाढत्या खर्चामुळे कंपनीना हा निर्णय घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी कारगिल दिन साजरा केला पाहिजे

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

SCROLL FOR NEXT