TATA Indica 
बिझनेस

TATA Indica: अशी रस्त्यावर अवतरली भारतीय INDICA कार; रीलॉन्चिंगनंतर झाली रिकॉर्ड ब्रेक विक्री, वाचा रोचक कहाणी

TATA Indica Story: टाटा समुहाने देशात पहिली स्वदेशी भारतीय कार बनवली होती. रतन टाटा यांनी ही इंडिका कार बनवून जेआरडी टाटा यांचे स्वप्न पूर्ण केलं.

Bharat Jadhav

भारतात तयार झालेली कार रस्त्यावर धावावी, असं स्वप्न जमशेदजी टाटा यांनी १८८० मध्ये पाहिलं होतं. इंग्रजांना जमशेदजी यांच्या स्वप्नावर विश्वास नव्हता. पण हे स्वप्न पूर्ण झालं तब्बल १०० वर्षानंतर. ते स्वप्न रतन टाटा यांनी पूर्ण केलं. भारत १९९० मध्ये स्पेसक्राफ्ट आणि क्षेपणास्त्रे तयार करू लागला होता. परंतु भारतीय बनावट असलेली कार भारतीय बाजारात नव्हती. त्यावेळी रतन टाटा यांनी कार बनवण्याचा विडा उचलला आणि भारताच्या रस्त्यावर भारतीय बनावटीची कार अवतरली. या कारची कहाणी आपण जाणून घेऊ .

रतन टाटा यांनी १९९५ मध्ये या मिशनवर काम सुरू केले. तोपर्यंत ते टाटा समूह आणि टाटा मोटर्सचे अध्यक्षही झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही अशी कार बनवू जी झेन आकाराची असेल. त्यात ॲम्बेसेडरइतकी अंतर्गत जागा असेल. मारुती 800 सारखी किंमत असेल आणि डिझेलच्या किफायतशीर दरावर चालेल सुद्धा. जमशेटजी टाटांचे स्वप्न जसे सर्वांनी नाकारले होते. त्याचप्रमाणे भारत स्वतःच्या गाड्या बनवू शकतो या रतन टाटा यांच्या विधानावर सर्वजण हसले. पण रतन टाटा यांनी सर्वांना चुकीचे सिद्ध करत टाटा इंडिका बनवली.

ज्यांच्या नावातही भारतीयत्वाची संपूर्ण झलक होती. रतन यांनी इंडिका बनवण्याचे काम पुण्यातील त्यांच्या कंपनीच्या अभियांत्रिकी संशोधन केंद्रातील अभियंत्यांना सोपवले होते. हे काम सोपे नव्हते, तेही अशा कंपनीसाठी ज्याने यापूर्वी कधीही कार बनवली नव्हती. एक कुटुंब पूर्ण बसेल अशा आकाराची कार बनवण्याचं आव्हान या कंपनीकडे होते. या कारचं ट्रान्समिशन सिस्टीम आणि इंजिन या सर्वांची रचना या अभियंत्यांनी केली. मग अखेर ही कार तयार झाली,

ऑस्ट्रेलियातील कंपनी आणली पुण्यात

कार तयार करण्यासाठी एक उत्पादन कारखाना आवश्यक असतो, त्यावेळी तो अस्तित्वात नव्हता. एका नवीन प्लांटसाठी 2 अब्ज डॉलर्सची गरज होती. त्यावेळी एवढी गुंतवणूक करणे टाटांना शक्य नव्हते. त्यावेळी रतन टाटा यांनी आपलं डोकं चालवत जगभरात प्लांटचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियात बंद पडलेला निसान प्लांट सापडला. टाटाच्या अभियंत्यांनी तेथे पोहोचून संपूर्ण साहित्याचे पॅकिंग करून ते समुद्रमार्गे पुण्यात सुरक्षितपणे आणले.

संपूर्ण प्लांट येथे बसवला. हे काम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण झाले आणि तेही नवीन प्लांटच्या केवळ २०% खर्चात. त्यानंतर १९९८ वर्षी टाटा इंडिका कार लॉन्च झाली. कार लॉन्च होताच त्याची भरपूर बुकिंग झाली. पण काही वेळाने तक्रारीही येऊ लागल्या. त्यावेळी पुन्हा एकदा रतन टाटा त्यांच्या कंपनीने सर्व उणिवा दूर करण्यास सुरुवात केली. इंडिका कार २००१ मध्ये नवीन नाव आणि पंचलाइनसह पुन्हा लॉन्च करण्यात आली. Indica V2 चे नाव आणि पंचलाईन होती ‘Even more car par car'.

तक्रारी आल्यानंतर या कार आणि कंपनीकडे लोकांनी पाठ फिरवली होती. तीच कार आणि कंपनी पुन्हा एकदा लोकप्रिय झाली. रतन टाटा यांनी ही कार पुन्हा लॉन्च केली. त्यानंतर रही इतकी विकली गेली की ती त्यावेळी सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. १८ महिन्यांत १ लाख कार विकल्या गेल्या. बीबीसी व्हील्स प्रोग्रामने तिला ३-५ लाख रुपयांच्या श्रेणीतील सर्वोत्तम कार म्हणून घोषित केले.

एकदा रतन टाटा यांना कार बनवण्या बाबत हा प्रश्न विचारण्यात आला की, त्यांनी ही भारतीय कार बनवण्याचा जोखमी असलेला निर्णय का घेतला? तर रतन टाटा यांनी उत्तर दिले - माझा ठाम विश्वास होता की, आमचे इंजिनिअर्स होते, ते अंतराळात रॉकेट पाठवू शकतात, ते आमच्या स्वतःची कार देखील बनवू शकतात. जेव्हा आम्ही कार बनवण्याचे आव्हान स्वीकारले तेव्हा आम्ही बाहेर पडलो आणि देशात आणि जगात जेथे मिळेल तेथे कौशल्य संपादन केले. त्यामुळे या गाडीत जे काही होते ते आमचेच होते. त्यामुळेच माझ्यासाठी इंडिका कार बनवणे हा अनुभव हा राष्ट्रीय कामगिरीसारखा अद्भूत अनुभव देणार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

Bigg Boss 18: 'मेरी मर्जी...' म्हणत विवियन अन् अविनाशने घरात घातला धुमाकूळ, 'टाइम गॉड' दिग्विजयच्या तोंडचे पाणी पळाले

Sangli News : शाळगाव एमआयडीसीत कंपनीमध्ये वायू गळती; दोन महिलांचा मृत्यू

Maharashtra Exit Poll: दिंडोरीमधून अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT