Tata Harrier EV Saam Tv
बिझनेस

Tata ची नवीन SUV कार, ऑडी सारखे लक्झरी फीचर्स, किंमत मारुती इतकी; मायलेजही जबरदस्त

Tata Harrier EV: Tata लवकरच आपल्या Harrier कारचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करू शकते. अलीकडेच टेस्टदरम्यान ताटाची नवीन इलेक्ट्रिक कार दिसली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Satish Kengar

आजकाल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ आहे. यातच इलेक्ट्रिक SUV कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच टेस्टदरम्यान टाटाच्या नवीन EV दिसून आली आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक Harrier ची ही EV आवृत्ती असल्याचे बोललं जात आहे.

सध्या बाजारात लक्झरी सेडान सेक्शनमध्ये ऑडी आणि मर्सिडीजची इलेक्ट्रिक वाहने आहेत. मात्र या सेगमेंटमध्ये कमी एसयूव्ही कार आहेत. यातच आता ताटाची नवीन कार या सेगमेंटमध्ये एन्ट्री घेणार आहे.

Tata Harrier EV लवकरच बाजारात येणार असून या कारची स्पर्धा Maruti eVX आणि Mahindra XUV.e8 शी होईल. या दोन्ही हाय रेंज इलेक्ट्रिक कार आहेत. ज्यात अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

Tata Harrier EV

ही एक मोठ्या आकाराची लक्झरी कार असेल, जी खास न्यू जनरेशनसाठी तयार करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारला 60 kWh बॅटरी पॅक मिळेल, ज्यामुळे एका चार्जवर ही कार 500 किमीपर्यंत सहज धावेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Harrier ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. या नवीन कारमध्ये 19 इंच अलॉय व्हील आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येणार आहे.

ही 4 व्हील ड्राइव्ह कार असेल, जी कसाही रस्ता असतो, ही कार आरामात चालवता येईल. सध्या कंपनीने डिलिव्हरीची तारीख आणि किंमत जाहीर केलेली नाही. असा अंदाज आहे की, ही कार नोव्हेंबर 2024 मध्ये लॉन्च होईल आणि तिचे बेस मॉडेल 30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये ऑफर केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

SCROLL FOR NEXT