Foxconn to invest Rs 1600 crore in Tamil Nadu Latest Update/File Photo SAAM TV
बिझनेस

Foxconn Investment In Tamil nadu : फॉक्सकॉन तामिळनाडूत; 1600 कोटींची गुंतवणूक, हजारो नोकऱ्या मिळणार

Foxconn to invest Rs 1600 crore in Tamil Nadu : इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉनने तामिळनाडू सरकारसोबत करार केला आहे.

साम वृत्तसंथा

Foxconn to invest Rs 1600 crore in Tamil Nadu : इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या तैवानच्या फॉक्सकॉन (Foxconn) ने तामिळनाडू सरकारसोबत करार केला आहे.

या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. त्यानुसार, राज्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साधारणपणे सहा हजारांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. राज्य सरकार आणि फॉक्सकॉन समूह यांच्यात करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावेळी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. तर फॉक्सकॉन समूहाचे प्रतिनिधित्व यंग लियू यांनी केलं.

फॉक्सकॉनची (Foxconn) सहायक कंपनी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेट (FII) त्यासाठी १६०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, क्लाउड सर्व्हिस टूल्स आणि इंडस्ट्रियल रोबोटची निर्मितीही करते.

फॉक्सकॉनचे हे युनिट चेन्नईजवळ सर्वात मोठ्या कॅम्पसमध्ये स्वतंत्रपणे उभारले जाणार आहे. तिथे फॉक्सकॉन अॅपलच्या आयफोन (Apple Iphones) अॅसेम्बल करते. राजधानी चेन्नईजवळील कांचीपुरम जिल्ह्यातील प्रस्तावित या युनिटसंदर्भात झालेल्या करारासंबंधी तामिळनाडूचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांनीही ट्विट करून माहिती दिली आहे.

६००० हजारांपेक्षा अधिक लोकांना मिळणार रोजगार

तामिळनाडूचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांच्या म्हणण्यानुसार, फॉक्सकॉनच्या या युनिटमध्ये ६००० हून अधिक लोकांना नोकरी मिळणार आहे. चेन्नईजवळील सध्या अस्तित्वात असलेल्या आयफोन असेंब्लिंग प्लांटमध्ये ३५ हजारांहून अधिक लोक काम करत आहेत. सन २०२४ मध्ये नव्या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

१ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

तामिळनाडूचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांनी सांगितले की, ही प्रस्तावित गुंतवणूक आणि येत्या काळात होणाऱ्या गुंतवणूक करारांसह तामिळनाडू हे जगातील अव्वल इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य होईल, अशी अपेक्षा आहे, तसेच आगामी काही वर्षांत त्यात मोठी वाढ होईल. तामिळनाडू राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे लक्ष्य आहे, त्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यात ही गुंतवणूक महत्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT