तुम्ही भरधाव वेगाने कार चालवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. वाहनचालक अरस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना विमा कंपन्या भरपाई देण्यास बांधील नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. यानुसार कोर्टानं ८० लाख रुपयांची भरपाई मागणारी याचिका फेटाळून लावलीय. एका रस्ते अपघातात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला होता, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी ८० लाख रुपयांची भरपाई मागितली होती. मात्र कोर्टानं त्यांची मागणी फेटाळून लावलीय.
हे प्रकरण १८ जून २०१४ चे आहे. एनएस रविशा नावाचा एक व्यक्ती त्याचे वडील, बहीण आणि तिच्या मुलांसह मल्लासंद्रा गावातून आर्सिकेरे शहरात फियाट लाइनिया कारने प्रवास करत होता. त्याने भरधाव वेगाने गाडी चालवली आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केले होतं. आर्सिकेरे येथील मायलानहल्ली गेटजवळ त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे त्याची कार उलटली. अपघातात झालेल्या दुखापतींमुळे रविशाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाने विमा कंपनीकडून ८० लाख रुपयांची भरपाई मागितली. दुसरीकडे, पोलिसांनी दावा केला की, रविशा यांनी बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे अपघात झाला. मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने या आधारावर भरपाईची मागणी फेटाळून लावलीय. या अपघातासाठी रविशा स्वतः जबाबदार आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही, असं न्यायाधिकरणाने म्हटलं होतं.
न्यायाधिकरणाच्या या निर्णयाविरुद्ध रविशाच्या कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयानेही भरपाई देण्यास मनाई केली. उच्च न्यायालयाने म्हटलं की, २००९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा हवाला देत म्हटलं की, रविशाच्या निष्काळजीपणामुळे आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे त्यांना भरपाई मिळणार नाही.
उच्च न्यायालयानेही असा निर्णय दिल्यानं रविशा यांच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात या निर्णयाविरोधात अर्ज केला. परंतु न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांची याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेच कारण नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.