Sukanya Samruddhi Yojana Saam T
बिझनेस

मुलगी २१ वर्षांची झाल्यावर मिळणार ७० लाख रुपये; पोस्ट ऑफिसची Sukanya Samruddhi Yojana नक्की आहे तरी काय?

Siddhi Hande

प्रत्येक मुलीच्या पालकांना तिच्या भविष्याची, शिक्षणाची आणि लग्नाची काळजी असते. मुलगी जन्माला आल्यापासूनच आपल्या मुलीच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी पालक पैसे साठवतात. परंतु हे पैसे एखाद्या सुरक्षित योजनेत किंवा एफडीमध्ये गुंतवले तर त्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप चांगला परतावा मिळतो. याच उद्देशातून केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलींच्या नावावर तुम्ही पैसे गुंतवू शकतात. त्यामुळे भविष्यात कधीही आर्थिक अडचण येणार नाही. (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत भरघोस परतावा दिला जातो. त्याचसोबत करात सूट दिली जाते. या योजनेत दहा वर्षांपर्यंतच्या मुलींच्या नावाने खाते उघडले जाते. या योजनेत तुम्ही कमीत कमी २५० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त १.५ लाखांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला कलम 80C अंतर्गत सवलत मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत तिमाही आधारावर व्याज दिले जाते. सध्या या योजनेत सर्वात जास्त व्याजदर दिले जाते.८.२ टक्के व्याजदर या योजनेत मिळते. या योजनेत जर मुलगी ५ वर्षांची असेल आणि तुम्ही वर्षाला १.२ लाखांची गुंतवणूक केली तर मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर ५५.६१ लाख रुपये मिळतील.

यातील १७.९३ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असेल तर ३८.६८ रुपयांचे व्याजदर मिळतेल. या योजनेत जर तुम्ही वर्षाला १.५० लाखांची गुंतवणूक करत असाल तर मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला ६९.८ लाख रुपये मिळतील.

सुकन्या समृद्धी योजनेत मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. त्यामुळे या योजनेत जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तेवढे तुमच्यासाठी चांगले असेल. (Sukanya Samruddhi Yojana News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Group : अजित पवार गटात वादंग; मावळ विधानसभेत सुनील शेळकेंना विरोध

Radhika Apte : राधिका आपटेकडे Good News! रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप

Cyber Crime : पोलीस अधिकारी असल्याचे भासवत फसवणूक; २ कोटी १८ लाखांचा लावला चुना, सायबर पोलीसात गुन्हा

Naralachi Vadi Recipe: घरच्या घरी बनवा, तोंडात विरघळणारी ओल्या नारळाची वडी

Maharashtra News Live Updates: महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT