Sukanya Samruddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana: सरकारची मुलींसाठी खास योजना! महिन्याला फक्त एवढे पैसे गुंतवा अन् ६५ लाख मिळवा

Sukanya Samruddhi Yojana: केंद्र सरकारने मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला ६५ लाख रुपये मिळतात.

Siddhi Hande

प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलींच्या भविष्याची काळजी असते. मुलींचे शिक्षण, लग्न सर्वकाही व्यवस्थित व्हावे, यासाठी आईवडील खूप प्रयत्न करतात. पालक आपल्या मुलींच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यासाठीच केंद्र सरकारने एक योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana) सुरु केली आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक व्याज मिळते. या योजनेतील व्याजदराची रक्कम वाढत असते. सध्या या योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. हे सर्वाधिक व्याजदर आहे. या योजनेत तुम्ही पैसे जमा केल्यावर मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी भासत नाही.

गुंतवणूक (Investment)

सुकन्या समृद्धी योजनेत २१ वर्षानंतर मुलींना पैसे मिळतात. या योजनेत मुलींच्या पालकांना १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. सुकन्या समृद्धी योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुली अर्ज करु शकतात.हे अकाउंट मुलींच्या पालकांच्या नावावर उघडले जाते. या योजनेत तुम्हाला २५० रुपयांपासून ते १.५० लाख रुपये जमा करु शकतात.

या योजनेत दोन मुलींच्या खात्यात कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळते. या योजनेत आता जर जुळ्या मुली असतील तरीही टॅक्समध्ये सूट मिळते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन अकाउंट उघडू शकतात.

महिन्याला एवढी रक्कम गुंतवा अन् ६५ लाख मिळवा

सुकन्या समृद्धी योजनेत व्याजदर बदलत असते. जर तुम्ही मुलीच्या जन्मानंतर १२,५०० रुपये महिना गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा होईल. तर तुम्हाला एका वर्षात १,५०,००० रुपये जमा करणार आहेत. १५ वर्षात ही रक्कम २२,५०,००० रुपये होईल. यावर जरी आपण ७.६ टक्के व्याजदर ग्राह्य धरले (सध्या हे व्याजदर ८.२ टक्के आहे, हे व्याजदर सतत बदलत असते.) तर ४३,४३,७०१ रुपये व्याजदराच्या रुपात मिळणार आहे. म्हणजेच मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला ६५,९३,७०१ रुपये मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT